रात्री उशिरा फिरणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी ठोठावला 1000 रुपयांचा दंड, 2 पोलीस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 08:38 PM2022-12-11T20:38:21+5:302022-12-11T20:39:26+5:30

या जोडप्याने संपूर्ण घटनेची माहिती ट्विटरवर शेअर केली, त्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

bengaluru two policemen suspend for take money from couples | रात्री उशिरा फिरणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी ठोठावला 1000 रुपयांचा दंड, 2 पोलीस निलंबित

रात्री उशिरा फिरणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी ठोठावला 1000 रुपयांचा दंड, 2 पोलीस निलंबित

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका जोडप्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हे जोडपे आपल्या घराबाहेर फिरत होते, त्यावेळी दोन पोलीस आले आणि त्यांनी दंडाच्या नावाखाली जोडप्याकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या जोडप्याने संपूर्ण घटनेची माहिती ट्विटरवर शेअर केली, त्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

ट्विटरवर आपली आपबीती शेअर करताना पीडित कार्तिक पात्री यांनी बंगळुरू पोलिसांना टॅग केले आणि एक प्रकारचा 'दहशतवाद' आहे का? असा सवाल केला. मात्र, पोलिसांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि पुष्टी केली आणि दोन्ही पोलिसांची ओळख पटली आहे. त्यानंतर या पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. कार्तिक यांनी सलग 15 ट्विट करून या घटनेची माहिती दिली. 

कार्तिक यांनी सांगितले की, ते त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीतून पत्नीसोबत घरी परत येत होते. त्यावेळी ते त्यांच्या घरापासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर असताना गस्ती पथकाने येऊन त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान कार्तिक यांनी आपले ओळखपत्रही दाखवले, मात्र दोन्ही पोलिसांनी त्यांचा फोन घेतला आणि त्यांची चौकशी सुरू केली. 

यादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने चलन पुस्तकासारखे काहीतरी काढले आणि आधार क्रमांक नोंदवायला सुरुवात केली, असे कार्तिक यांनी सांगितले. यावर कार्तिक यांनी पोलीस कर्मचार्‍यांनाही चलन कशासाठी दिले जात आहे, असा सवाल केला. तेव्हा संबंधित पोलिसांनी सांगितले की, रात्री 11 वाजल्यानंतर रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. यावर या जोडप्याने आपल्याला अशा कोणत्याही नियमाची माहिती नसल्याचे सांगितल्यावर पोलीस कर्मचारी म्हणाले की, तुमच्यासारख्या सुशिक्षितांना या नियमांची माहिती असावी. यानंतर जोडप्याने पोलिसांसोबत बातचीत करणे थांबले असता पोलिसांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. मात्र बोलणी झाल्यावर पोलिसांनी एक हजार रुपये देण्यास होकार देत ऑनलाइन पेमेंट घेतले. 

घटनास्थळावरून बाहेर पडल्यानंतर कार्तिक पात्री यांनी बंगळुरू पोलिसांना टॅग केले आणि पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे, कार्तिक यांच्या ट्विटनंतर, उत्तर पूर्व डीसीपी अनुप ए शेट्टी यांनी कार्तिक यांच्या मेसेजला उत्तर दिले आणि लिहिले की, ही बाब आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यानंतर काही वेळातच, बंगळुरू पोलिसांनी ट्विट केले की, या घटनेला जबाबदार असलेल्या दोन पोलिसांची ओळख पटली आहे, त्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Web Title: bengaluru two policemen suspend for take money from couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.