'बेड' विकायचा होता...साईटवर फोटो टाकले...एकाने फोन केला अन् पुढे जे घडलं ते...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 02:38 PM2023-12-15T14:38:27+5:302023-12-15T14:40:50+5:30

बंगळूरुमध्ये एका ३९ वर्षीय व्यक्तीला सायबर गुंडांनी लाखोंचा गंडा घातला आहे.

Bengluru cyber crime news engineer trying to sell online bed share oto with buyers and looses rupees 68 lakh  | 'बेड' विकायचा होता...साईटवर फोटो टाकले...एकाने फोन केला अन् पुढे जे घडलं ते...!

'बेड' विकायचा होता...साईटवर फोटो टाकले...एकाने फोन केला अन् पुढे जे घडलं ते...!

Crime News : सायबर स्कॅमच्या नवनवीन घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. स्कॅमर्स सर्वसामान्य लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत. अगदी सहजरित्या लोकांचे बॅंक डिटेल्स किंवा इतर माहिती हस्तगत करून लाखोंची फसवणूक केली जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना बंगळूरुमध्ये घडली आहे. ज्यामध्ये एका ९ वर्षीय व्यक्तीची सायबर हॅकर्सनी जवळपास ६८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबतसंबंधित व्यक्तीने तक्रार दिली आहे. आतापर्यंत घडलेला सगळ्यात मोठा सायबर स्कॅम हा बंगळूरूत झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

या इंजिनिअर व्यक्तीने त्याच्या घरातील बेड विकण्यासाठी ऑनलाईन साईटवर जाहिरात प्रसिद्ध केली. ओएलएक्सवर १५ हजार रुपयांत बेड विकण्याची जाहिरात त्याने दिली होती. त्यावर एका अज्ञात व्यक्तीकडून त्याला बेड खरेदी करण्यासाठी कॉल आला. या व्यक्तीचा बेड खरेदी करण्यासाठी समोरील गिऱ्हाईकाने इच्छा दर्शवली. 

अतिशय हुशारीने बॅंक डिटेल्स आणि ओटीपी मागत सायगबर हॅकरने या व्यक्तीची फसवणूक केली. आदिश असे फिर्यादी व्यक्तीचे नाव आहे. ६ डिसेंबरला आदिशने ओएलएक्सवर बेड विक्रीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर रोहित मिश्रा नावाच्या व्यक्तीकडून आदिश यांना कॉल आला. काही रक्कम टोकन स्वरुपात देऊन सायबर चोराने अवघ्या तीन दिवसांत त्या व्यक्तीचे अकाउंट खाली केले. तक्रारीनूसार, या इंजिनिअर व्यक्तीच्या अकाउंटमधून ६८ लाखांचे तीन ऑनलाईन व्यवहार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मात्र, जेव्हा ऑनलाईन पेमेंट करताना रोहित शर्मा नावच्या व्यक्तीने आदिश यांना त्याच्या अकाउंटवर ५ रुपये पेमेंट करण्यासाठी सांगितले. त्याच्या अकाउंटवरून पेमेंट होत नसल्याचे सांगत या इंजिनिअर व्यक्तीस त्याने त्याच्या जाळ्यात अडकवले. सुरुवातीला ५ रुपये त्यानंतर १० रुपये असे करता करता शर्मा नावाच्या व्यक्तीने आदिशकडून १५ हजार रुपये उकळले. काही वेळानंतर आदिश यांच्या यूपीआय अकाउंटवरुन धडाधड रक्कम डेबिट होऊ लागली. 

दरम्यान, या व्यक्तीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्याचे बॅंक अकाउंट तत्काळ बंद करण्यात आले. बंगळूरुमध्ये आतापर्यंत घडलेला सगळ्यात मोठा सायबर स्कॅम असल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात ९ डिसेंबरला तक्रार दाखल करण्यात आली. शिवाय आरोपीवर सेक्शन ४१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bengluru cyber crime news engineer trying to sell online bed share oto with buyers and looses rupees 68 lakh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.