अन् एसपी हसन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

By चैतन्य जोशी | Published: September 23, 2023 08:37 PM2023-09-23T20:37:25+5:302023-09-24T10:38:27+5:30

अप्पर पोलिस अधीक्षकांसह सहा अधिकाऱ्यांचाही गौरव

'Best Detection' Award to Superintendent of Police Nurul Hasan, Six accused were arrested in five hours | अन् एसपी हसन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

अन् एसपी हसन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

googlenewsNext

वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील पोहणा शिवारात सशस्त्र दरोडा टाकून चार कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या पाच तासांत अटक करून तब्बल ३ कोटी ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल रिकव्हर केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित केले. ही वर्धेकरांसाठी गौरवाची बाब म्हणावी लागेल.

गणेशोत्सव, तसेच आगामी येणाऱ्या इद मिलादुन्नबी सणानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे वर्ध्यात आले होते. त्यांनी पोलिस वर्धा तसेच हिंगणघाट येथे भेट देत पाहणी करीत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर वर्धा पोलिस विभागाला शाब्बासकी देत त्यांना पाठीवर कौतुकाची थाप दिली. नागपूर येथील कार्यालयातून ४ कोटी ५२ लाखांची रक्कम घेऊन कारने हैदराबादकडे जाणाऱ्यास अडवून पाच आरोपींनी कारचालकास मारहाण करून चार कोटी रुपयांची रक्कम लुटली होती. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देत जवळपास १०० अधिकारी व अंमलदारांची १५ पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना करून तांत्रिक तपास करीत अवघ्या पाच तासांत सर्व आरोपींना अटक करून तब्बल ३ कोटी ४६ लाखांची रक्कम रिकव्हर करुन संपूर्ण महाराष्ट्रात यशाचा डंका वाजवला होता. ही कारवाई संपूर्ण राज्यात पहिली मोठी कारवाई ठरली होती. त्या अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

गणेशोत्सव, तसेच आगामी येणाऱ्या इद मिलादुन्नबी सणानिमित्त जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे वर्ध्यात होते. त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील हॉलमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर वर्धा पोलिस विभागाला शाब्बासकी देत त्यांना पाठीवर कौतुकाची थाप दिली.

नागपूर येथील कार्यालयातून ४ कोटी ५२ लाखांची रक्कम घेऊन कारने हैदराबादकडे जाणाऱ्यास अडवून पाच आरोपींनी कारचालकास मारहाण करून चार कोटी रुपयांची रक्कम लुटली होती. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देत जवळपास १०० अधिकारी व अंमलदारांची १५ पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना करून तांत्रिक तपास करीत अवघ्या पाच तासांत सर्व आरोपींना अटक करून ३ कोटी ४६ लाखांची रक्कम रिकव्हर केली. ही संपूर्ण राज्यात पहिली मोठी कारवाई ठरली. त्या अनुषंगाने विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड यांना ‘बेस्ट डिटेक्शन’ अवॉर्ड देत प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: 'Best Detection' Award to Superintendent of Police Nurul Hasan, Six accused were arrested in five hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस