शंकरनगरात बनावट ‘आयडी’ने आयपीएलवर बेटिंग

By प्रदीप भाकरे | Published: April 9, 2023 04:21 PM2023-04-09T16:21:00+5:302023-04-09T16:21:25+5:30

तिघांविरूध्द गुन्हा, एकाला अटक : तार झारखंडशी जुळले, राजापेठ पोलिसांची कारवाई 

Betting on IPL with fake ID in Shankarnagar Amravati | शंकरनगरात बनावट ‘आयडी’ने आयपीएलवर बेटिंग

शंकरनगरात बनावट ‘आयडी’ने आयपीएलवर बेटिंग

googlenewsNext

अमरावती : स्थानिक शंकरनगरात बनावट आयडी वापरून चाललेली क्रिकेट बेटिंग राजापेठ पोलिसांनी उधळून लावली. ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाचनंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी रात्री १०.३० च्या सुमारास तिघांविरूद्ध फसवणूकीसह जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. तर दिपेश राम नानवाणी (२५, रा. शंकरनगर) याला अटक केली. तर भजन मुकेश नवलानी (२१, कंवरनगर) व विशाल (रा. रायपूर, छत्तीसगढ) हे फरार आहेत. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ५ एप्रिल रोजी अंबिकानगर व रिंगरोडवर कारवाई करत चार सटटेबाजांना अटक केली होती. त्यानंतर तीनच दिवसात क्रिकेट बेटिंगचा हब समजल्या जाणाऱ्या शंकरनगर भागात राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली.

 आरोपी दिपेश नानवानी हा क्लासिक एक्सच ९९ नामक बेकायदा आयडीद्वारे आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईच्या सहाय्याने बेटिंग करत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याचे घर गाठले. त्यावेळी तो राजस्थान रॉयल व दिल्ली कॅपिटल या मॅचवर लगवाडी व खयवाडी करताना आढळून आला. तो ज्या गैरकायदेशीर ॲपवर बेटिंग करताना आढळला. त्या ॲपमध्ये बॅक अर्थात खाया, एलएवाय ‘ले’ अर्थात खाया व सेशन मार्केट असे तीन पर्याय दिसून आले. त्या आयडीमध्ये ८३५० रुपये २० पैसे अशी शिल्लक दिसून आली.

दिपेशने सांगितली जुगाराची पध्दत अटक आरोपी दिपेश नानवानीनुसार, पैशाची हारजित करण्याकरीता त्या आयडीमध्ये पैशाची अर्थात बॅलेन्सची आवश्यकता असते. त्याआधारे खयवाडी व लगवाडी केली जाते. ग्राहकाने पैसे दिल्यानंतर पुढील मास्टर आयडी वापरनारा इसम त्याच्या आयडीच्या खात्यावर तेवढे बॅलेन्स जमा करतो. त्यामधून तो हारजितचा खेळ खेळला, खेळविला जातो, अशी कबुली आरोपी बुकी दिपेशने दिली.

आरोपीने दिली बोगस आयडीची कबुली
ती गैरकायदेशिर ‘आयडी’ आपल्याला भजन मुकेश नवलानी व रायपूर येथील विशाल नामक आरोपीने दिल्याची कबुली आरोपी दिपेश नानवानी याने दिली. सबब, आरोपी हे अवैधरित्या क्रिकेटवर बेटिंग अर्थात जुगार खेळत असून त्यापोटी शासनाकडे कुठलाही कर भरत नाहीत. त्यांनी शासनाची फसवणूक चालविली आहे. सोबतच वेगवेगळ्या बोगस आयडी तयार करुन त्या आधारे ते स्वत:च्या फायद्यासाठी लोकांची फसवणूक करताना आढळून आल्याचे राजापेठचे पोलीस अंमलदार मनीष करपे यांनी नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Betting on IPL with fake ID in Shankarnagar Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.