सावधान! पेमेंट अ‍ॅपवर कोणाचे चुकून पैसे आले तर...; फ्रॉडची नवीन ट्रिक...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:13 AM2023-03-20T10:13:57+5:302023-03-20T10:14:41+5:30

आपण विचार काय करतो, की दुसऱ्याचे पैसे आहेत. पाठवुयात. परंतू, तुम्हालाच चुना लागणार आहे, याची कल्पनाही नसते.

Beware! If someone gets paid by mistake on PhonePe, Google Pay...; Fraud's new trick... | सावधान! पेमेंट अ‍ॅपवर कोणाचे चुकून पैसे आले तर...; फ्रॉडची नवीन ट्रिक...

सावधान! पेमेंट अ‍ॅपवर कोणाचे चुकून पैसे आले तर...; फ्रॉडची नवीन ट्रिक...

googlenewsNext

देशात जसजसे डिजिटल पेमेंट वाढू लागलेय तसतशे फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले आहेत. कधी एसएमएस पाठवून, कधी लिंक पाठवून तर कधी फोन करून हॅकर्स लोकांना लुबाडत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत तर १८ लोकांकडून १ कोटी रुपये लुटले गेले आहेत. हा फ्रॉड एकदम नवीन आहे, यामुळे याला फसू नका. सावध व्हा. 

स्कॅमर्सनी पेमेंट अॅप युजर्सना ठकविण्याचा नवा प्रकार शोधून काढला आहे. जुने सर्व प्रकार सुरुच आहेत, परंतू नवा प्रकार एवढा धक्कादायक आहे की विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न पडला आहे. हे चोर तुमच्या खात्यावर मुद्दामहून पैसे पाठवत आहेत. यानंतर तुम्हाला फोन करून चुकून पैसे पाठविले गेले, आम्हाला ते परत पाठवा असे सांगितले जात आहे. दिल्लीचे सायबर लॉ एक्स्पपर्ट पवन दुग्गल यांनी ही माहिती दिली आहे. 

आता आपण विचार काय करतो, की दुसऱ्याचे पैसे आहेत. पाठवुयात. परंतू, तुम्हालाच चुना लागणार आहे, याची कल्पनाही नसते. तुम्ही त्यांना परत पैसे पाठविलेत की हॅकिंगचा शिकार बनलात म्हणून समजा. 

सायबर एक्स्पर्टनुसार हा एकप्रकारचा मालवेअर आहे. याद्वारे तुम्हाला काही पैसे पाठविले जातात. मग चुकून ते तुमच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याचे सांगितले जाते. तसेच ते परत करण्याची विनवणीही केली जाते. हे पैसे तुम्ही जसे परत करता, त्याचवेळी पेमेंट अॅप अकाऊंट हॅक होते. हा ह्युमन इंजिनिअरिंग आणि मालवेअरचा मिक्स असा फ्रॉड आहे. 

पैसे परत पाठविल्याने काय होते? 
तुम्ही पैसे परत पाठविले की तुमचा पूर्ण डेटा त्या हॅकरकडे जातो. हा डेटा कोणत्याही अकाऊंटला हॅक करण्यास पुरेसे असतात. हा मालवेअर अँटी मालवेअर सॉ़फ्टवेअरलाही पकडता येत नाही. यामुळे तुमचे अकाऊंट झटक्यात रिकामे होऊ शकते.

Web Title: Beware! If someone gets paid by mistake on PhonePe, Google Pay...; Fraud's new trick...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.