विनाहेल्मेट फिरणाऱ्यांनो सावधान! आता दाखल होणार गुन्हे, पोलीस आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 10:05 PM2022-04-03T22:05:35+5:302022-04-03T22:06:28+5:30

Sanjay Pandey : विनाकारण हॉर्न वाजविणेही पडू शकते महागात

Beware of those who walk without helmets! Cases to be filed now, warns Commissioner of Police | विनाहेल्मेट फिरणाऱ्यांनो सावधान! आता दाखल होणार गुन्हे, पोलीस आयुक्तांचा इशारा

विनाहेल्मेट फिरणाऱ्यांनो सावधान! आता दाखल होणार गुन्हे, पोलीस आयुक्तांचा इशारा

Next

मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरु असताना आता विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणारेही आयुक्त संजय पांडे यांच्या रडारवर आले आहे. त्यांच्यावरही थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांकडून देण्यात आला आहे. 
             

संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्ह द्वारे नागरिकांशी संवाद साधत कामाचा लेखा जोखा मांडला. यादरम्यान संडेस्ट्रीटला नागरिकांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत आनंद व्यक्त केला. यावेळी विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वी आयुक्तांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांवर आता बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. गेल्या २० दिवसात मुंबईतून तब्ब्ल ४ हजार ६८९ खटारा हटवण्यात आले आहे. तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या विरोधात २ हजार १८३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे विना हेल्मेटवरील कारवाईचा वेग वाढणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

ड्रग्जवरील कारवाईलाही सुरुवात
ड्रग्जवरील कारवाईला सुरुवात करत २४ तासांत मुंबईत ड्रग्ज सेवना संबंधित ४१ गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यामध्ये ४३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ लाख २४ हजार ७५० रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तसेच, ड्रग्ज तस्करी प्रकरणी ५ गुन्हे नोंदवत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. येत्या काळात ही कारवाई देखील आणखीन वाढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Beware of those who walk without helmets! Cases to be filed now, warns Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.