ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या महिलांनो सावधान, २२ हजार जणांची झालीय फसवणूक
By पूनम अपराज | Published: January 17, 2021 08:56 PM2021-01-17T20:56:58+5:302021-01-17T20:57:46+5:30
Cyber Crime : बनावट शॉपिंग साईटच्या माध्यमातून देशभरातील २२ हजार नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली.
मुंबईत एका ३२ वर्षीय तरुणानं ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांना फसवल्याचे समोर आलं असून याद्वारे त्याने ७० लाख रुपयांना गंडा घातला आहे. बनावट शॉपिंग साईटच्या माध्यमातून देशभरातील २२ हजार नागरीकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपी बहुसंख्य महिलांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. आशिष अहिर(32) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.
Maharashtra | Mumbai Police have arrested a 32-year-old man who was allegedly cheating people, particularly women in the name of online shopping. Police say that he cheated around 22,000 people for over Rs 70 lakhs. Further investigation underway
— ANI (@ANI) January 17, 2021
आशिषने लंडनमधून आयटीचे शिक्षण घेतले आहे. आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी अशा आणखी ११ बनावट संकेतस्थळांची ओळख पटवली आहे. shopiiee.com या संकेतस्थळाबाबत पोलिसांना अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. याबाबत करण्यात आलेल्या सखोल तपासाअंती आरोपींनी २२ हजार व्यक्तींची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. संकेतस्थळांच्या माध्यमातून महिलांचे कपडे, खोटे दागिने, घरगुती वस्तूंची विक्री करण्यात येत होती. फेसबुकच्या सहाय्याने त्याची जाहिरातही करण्यात येत होती. तपासानंतर आरोपी सूरतमधून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला अटक करून मुंबईत आणण्यात आले. या संकेतस्थळांबाबत अनेक तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी त्याच्या साथीदारांची ओळख पटली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
फसवणूक करण्यात आलेल्या वेबसाईट्स खालीलप्रमाणे
1) https://white-stones.in/,
2) https://jollyfashion.in/,
3) https://fabricmaniaa.com/.
4) https://takesaree.com/,
5) https://www.assuredkart.in,
6) https://republicsaleoffers.myshopify.com/,
7) https://fabricwibes.com/,
8) https://efinancetix.com/,
9) https://www.thefabricshome.com/,
10) https://thermoclassic.site/,
11) https://kasmira.in/
पोलिसांचे आवाहन
शक्यतो ऑनलाईन शॉपिंग करताना कॅश ऑन डिलेव्हरी (सीओडी) हे सिलेक्ट करूनच ऑनलाईन शॉपिंग करावी, secure gateway निवडावा, मोठ्या प्रमाणावर सूट देणाऱ्या वेबसाईटवर खरेदी करताना खबरदारी घ्यावी.
मुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल २२,००० लोकांची फसवणूक, ७० लाखांना घातला गंडा pic.twitter.com/RefgIh3RAO
— Lokmat (@MiLOKMAT) January 17, 2021