महिलेचे हात-पाय-स्तन कापून हत्या; रक्तबंबाळ अवस्थेत तिने मुलाला सांगितली आरोपींची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 06:58 PM2022-12-05T18:58:31+5:302022-12-05T18:59:11+5:30

याप्रकरणी पोलिसांनी शकील आणि मोहम्मद जुद्दीन नावाच्या आरोपींना अटक केली आहे.

Bhagalpur Murder Case; women chopped and killed on road, shakeel and mohammad arrested | महिलेचे हात-पाय-स्तन कापून हत्या; रक्तबंबाळ अवस्थेत तिने मुलाला सांगितली आरोपींची नावे

महिलेचे हात-पाय-स्तन कापून हत्या; रक्तबंबाळ अवस्थेत तिने मुलाला सांगितली आरोपींची नावे

googlenewsNext

भागलपूर: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड सारखीच एक घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. भररस्त्यात नीलम नावाच्या महिलेची शरीराचे अवयव कापून हत्या करण्यात आली. महिलेच्या गावातील शकील या व्यक्तीने त्याच्या भावासोबत मिळून महिलेचे हात, कान आणि स्तन कापले. आरोपी पायही कापणार होते, मात्र कोणीतरी आल्याने दोघेही पळून गेले. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी शकील आणि त्याचा भाऊ मोहम्मद जुद्दीनला अटक केली आहे. 

आईने मुलाला सांगितले शकीलचे नाव
महिलेचा मुलगा कुंदन याने सांगितले की, तो आईसोबत सायकलने पिरपेंटी मार्केटला गेला होता. घरी परतत असताना त्याने आईला सिंघिया पुलापासून काही अंतरावर सोडले. आई पायी घरी जात होती, तेव्हाच शकील आणि जुद्दीनने हा हल्ला केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिचा पती अशोक यादव याला फोन केला. पतीने मुलाला माहिती दिली. मुलगा आईजवळ पोहोचला तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या अवस्थेतही शकीलने हातपाय कापल्याचे आईने मुलाला सांगितले.

पोलिसांनी शस्त्र जप्त केले
आरोपींनी चिकन चॉपरने महिलेचे अवयव कापले होते. पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यार जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून आणखी शस्त्रे जप्त केली आहेत. घटनास्थळावरून एकाची चप्पल व भांडे, तुटलेल्या बांगड्या आणि रक्ताने माखलेली मातीही सापडली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

या कारणामुळे केली हत्या
मृत महिलेचे पती अशोक यादव यांनी सांगितले की, तो किराणा दुकान चालवतो. त्याची पत्नी नीलमही दुकानात बसायची. मोहम्मद शकील अनेकदा कोणतेही काम नसताना त्याच्या दुकानात येत असे. एके दिवशी बायकोने त्याला हटकले आणि दुकानात येऊ नकोस, असे सांगितले. याशिवाय काही पैशांचाही वाद होता. या कारणामुळेच शनिवारी आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने वार केले.

Web Title: Bhagalpur Murder Case; women chopped and killed on road, shakeel and mohammad arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.