पत्नी DSP, मग भीती कशाची? रिकामटेकड्या पतीला रातोरात बनवले IPS; PMO तही उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 08:12 PM2021-08-03T20:12:55+5:302021-08-03T20:14:23+5:30
Reshu Krishna husband Roshan krishna IPS controversy: एसडीपीओ रेशू कृष्णा यांचा पती आयपीएसच्या वर्दीमध्ये आहे. रेशू यांनी आपल्या पतीसोबत जो फोटो शेअर केला त्यात पतीने आयपीएसची वर्दी घातलेली आहे. खांद्यावरील बॅजवर आयपीएस लिहिलेले आहे, डोक्यावर टोपी आहे. दोघांनी पोलिसांच्या कारमध्ये फोटो काढत व्हिक्ट्री साईन दाखवलेली आहे.
भागलपूर: देशाला राजकारणी जावयांची व्याख्या माहिती असेल. महिला आरक्षणामुळे घरातील महिलेला किंवा पत्नीला निवडणुकीत उभे करायचे आणि सारा कारभार आपणच हाताळायचा हे अनेक ठिकाणी होत आहे. पतीराज अगदी ग्राम पंचायतीपासून ते पार आमदारकी, खासदारकीपर्यंत होते. परंतू बिहारमध्ये एक एसा प्रकार घडला आहे की, त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने (PMO) घेतली आहे. (bhagalpur sdpo kahalgaon reshu krishna made her husband Roshan krishna as IPS uniform photo viral in victory sign on social media)
कहलगावच्या एसडीपीओ (Sub Divisional Police Officer) रेशू कृष्णाने (reshu krishna) आपल्या पतीला रातोरात आयपीएस अधिकारी बनविले. एसडीपीओला बिहारमध्ये आधी डीएसपी (DSP) संबोधले जायचे. या दोघा नवरा-बायकोने फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि अख्ख्या पोलीस दलात खळबळ उडाली. कोणीतरी याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाला (Prime Minister's Office) केली.
एसडीपीओ रेशू कृष्णा यांचा पती आयपीएसच्या वर्दीमध्ये आहे. महत्वाचे म्हणजे हा पती काहीच कामधंदा करत नाही. रेशू यांनी आपल्या पतीसोबत जो फोटो शेअर केला त्यात पतीने आयपीएसची वर्दी घातलेली आहे. खांद्यावरील बॅजवर आयपीएस लिहिलेले आहे, डोक्यावर टोपी आहे. दोघांनी पोलिसांच्या कारमध्ये फोटो काढत व्हिक्ट्री साईन दाखवलेली आहे.
रेशू कृष्णा यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पीएमओकडे झालेल्या तक्रारीत रेशू यांचा पती काहीही काम करत नाही. मग त्यांना आयपीएसची वर्दी कशी काय दिली? असा सवाल करण्यात आला आहे. रेशू या स्वत: सांगत फिरतात की त्यांचा पती आयपीएस आहे आणि पीएमओमध्ये काम करतात. अशा प्रकारची तक्रार आल्यावर पीएमओने गंभीरतेने घेतले आणि ही तक्रार बिहार पोलीस मुख्यालयाला पाठवून दिला. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
बिहार मुख्यालयाने यावर चौकशी लावली असून रेशू यांचा पती आयपीएस अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
चौकशीचा ससेमिरा मागे लागताच, रेशू आणि त्यांच्या पतीने सोशल मीडियावरून त्यांचा फोटो डिलीट केला आहे. मात्र, त्या आधीच हा फोटो व्हायरल झाला होता. सामान्य लोकांना ही वर्दी घालण्याची परवानगी नाही. असे केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची कारवाई केली जाते. तर आयपीसीच्या कलम 140 नुसार तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा आहे.