नात्याला काळीमा! संतापलेल्या जावयाने सासू सासऱ्यांसह आपल्या लेकालाही जिवंत जाळलं, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 02:29 PM2021-10-06T14:29:37+5:302021-10-06T14:37:56+5:30

Crime News : एका संतापलेल्या जावयाने दारुच्या नशेत सासू-सासऱ्यांवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

bhagalpur son in law burnt alive his in laws and child after dispute at bhagalpur bihar | नात्याला काळीमा! संतापलेल्या जावयाने सासू सासऱ्यांसह आपल्या लेकालाही जिवंत जाळलं, घटनेने खळबळ

नात्याला काळीमा! संतापलेल्या जावयाने सासू सासऱ्यांसह आपल्या लेकालाही जिवंत जाळलं, घटनेने खळबळ

Next

नवी दिल्ली - बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका संतापलेल्या जावयाने दारुच्या नशेत सासू-सासऱ्यांवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीरपेंती ब्लॉकच्या एकचारी दियारा येथे ही भयंकर घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलालाही आगीच्या स्वाधीन केले. जावयाने तिघांवर पेट्रोल ओतताच, पेट्रोलच्या वासाने सासरे सुरेश मंडल यांना जाग आली. त्यावेळी जावयाने घरात कोणीही जिवंत राहणार नाही अशी धमकी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जळालेल्या तिघांना नातेवाईकांनी तातडीने स्थानिक पीएचसीहून जवाहरलाल नेहरू वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु वाटेत भागलपूर कहळगाव रस्ता जाम असल्याने सासू कलावती देवी (55) यांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान, सासरे सुरेश मंडल यांचाही मायागंज रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर पाच वर्षीय आदित्यची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मुलाचे शरीरही मोठ्या प्रमाणात जळाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.

मनोज मंडल याला अटक करण्यासाठी पोलीस करताहेत छापेमारी

पोलिसांनी  या घटनेनंतर आरोपी असलेल्या मनोज मंडल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी एकेरीच्या ओलनी टोला येथील रहिवासी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मनोज मंडल याला अटक करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. आरोपीची पत्नी लक्ष्मीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती मद्यपी आहे आणि दारूच्या नशेत अनेकदा घरात मारहाण करत असे. यासंदर्भात वारंवार भांडणे होत असत. याला लक्ष्मीचे आई-वडील विरोध करीत होते. याच कारणामुळे रागाच्या भरात त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

पोलीस या प्रकरणाचा करताहेत तपास

लक्ष्मी यांनी पोलिसांना तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेचे संबंध आहेत, ज्याला तिच्या आई आणि वडिलांनी विरोध केला होता. याविषयीही त्याच्या मनात खूप राग होता. तसेच मनोज मंडलची त्याच्या सासरच्यांच्या मालमत्तेवर नजर होती. सर्व गोष्टींचा तपास केल्यानंतर पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी छापे टाकत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: bhagalpur son in law burnt alive his in laws and child after dispute at bhagalpur bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.