भंडारा : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:35 PM2021-08-04T13:35:33+5:302021-08-04T13:36:39+5:30

घराबाहेर एका कामासाठी पडलेल्या अल्पवयीन मुलींवर करण्यात आला अत्याचार. मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली घटना.

Bhandara: Two minor girls tortured, accused arrested by police | भंडारा : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक

भंडारा : दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे घराबाहेर एका कामासाठी पडलेल्या अल्पवयीन मुलींवर करण्यात आला अत्याचार.मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली घटना.

लाखांदूर (भंडारा) : शिलाईचे कपडे आणण्यासाठी जात असलेल्या ११ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर एका ५५ वर्षीय अत्याचार केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली. ही घटना ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलींच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरोधात अत्याचारस सह अन्य विविध कलमान्वये व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. मधुकर हरी रंगारी (५५) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास दोन्ही अल्पवयीन मुली शिलाईला दिलेले कपडे आणण्यासाठी जात होत्या. दरम्यान मधुकर रंगारी याने दोन्ही अल्पवयीन मुलींना स्वतःच्या घरी जबरदस्ती खेचून दार बंद केले. यावेळी दोन्ही मुलींनी आरडाओरड केली असता त्यांचे तोंड दाबून मारहाण केली. तसेच दोघांवर अत्याचार केला. मुलींच्या ओरडण्याचे आवाज येतात घराशेजारील लोकांनी खिडकीतून डोकाऊन पाहिले असता मधुकर हा दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत असल्याच्या स्थितीत आढळून आला.

घटनेची माहिती पीडित मुलींच्या पालकांना होताच त्यांनी तात्काळ लाखांदूर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद केली. दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींचे आरोग्य तपासणी अहवालावरून लाखांदूर पोलिसांनी मधुकर रंगारी विरोधात विविध कलमांसह पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली आहे. तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे करत आहेत.

Web Title: Bhandara: Two minor girls tortured, accused arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.