धक्कादायक! प्रेमी युगुलाने महिलेचा गळा चिरून केली हत्या, दीड महिन्यानी उलगडलं हत्येचं गूढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 02:32 PM2021-05-29T14:32:44+5:302021-05-29T14:33:46+5:30
मृत महिलेचं नाव रत्नाबेन मोहनलाल जैन(७०) असून त्या भांडूप पश्चिममधील फुगावाला कंपाऊंट परिसरात एका चाळीतील घरात राहत होत्या.
मुंबईतील भांडूप परिसरातील एका चाळीमध्ये एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची दीड महिन्याआधी गळा चिरून हत्या (elderly woman murder by Slitting throat) करण्यात आली होती. मात्र, ही हत्या कोणी केली? याचा काही सुगावा लागत नव्हता. गेल्या दीड महिन्यापासून पोलीस ही केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते. आता अखेर दीड महिन्यांनी या हत्येचं गूढ उलगडलं गेलं आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून एका प्रेमी युगुलाला (Couple arrest) अटक केली. महिलेची हत्या झाल्यापासून हे प्रेमी युगुल भांडूप परिसरातून गायब होतं.
मृत महिलेचं नाव रत्नाबेन मोहनलाल जैन(७०) असून त्या भांडूप पश्चिममधील फुगावाला कंपाऊंट परिसरात एका चाळीतील घरात राहत होत्या. १४ एप्रिल रोजी त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेला रत्नाबेन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळून आला. याच महिलेनं याची माहिती शेजारी राहणाऱ्या लोकांना आणि भांडूप पोलिसांना दिली. (हे पण वाचा : अरे देवा! प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या, मनाला चटका लावणारी लव्हस्टोरी)
मृत महिला रत्नाबेन मोहनलाल जैन या सावकारीचा व्यवसाय करत होत्या. त्यामुळे ही हत्या पैशाच्या अथवा चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. याच दिशेने त्यांनी तपास केला असता, या हत्येचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील एका प्रेमी युगुलापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ही हत्या नियोजित कटाचा भाग असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली आहे. (हे पण वाचा : अमेरिकेत बसून त्याने रचला पत्नीच्या हत्येचा कट, ट्रकखाली चिरडून केली हत्या; असा झाला खुलासा)
द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हत्या झाल्यानंतर आरोपींनी महिलेचे साडे तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटले होते. पण घरात सुरक्षित ठिकाणी ठेवलेली तीन लाख रुपयांची रक्कम तशीच होती. दरम्यान पोलिसांनी मृताच्या घरातून एक वही जप्त केली आहे. ज्यामध्ये महिलेनं कोणत्या व्यक्तीला किती रुपये उधार दिलेत याचा हिशोब लिहिलेला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.