वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या भंगारवाल्यास पोलिसांनी केली ४८ तासात अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 01:15 PM2020-11-19T13:15:15+5:302020-11-19T13:15:54+5:30

Murder and Arrest : हत्या करतेवेळेस आरोपीने शकुंतला ठाकूर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील यांची जबरी चोरी केली होती.              

Bhangarwala, who murdered an old woman, was arrested by the police within 48 hours | वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या भंगारवाल्यास पोलिसांनी केली ४८ तासात अटक 

वृद्ध महिलेची हत्या करणाऱ्या भंगारवाल्यास पोलिसांनी केली ४८ तासात अटक 

Next
ठळक मुद्देयाबाबत तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं.239/2020 कलम 302,394 भा. दं. वि. नोंद करण्यात आला होता.

पनवेल - तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील नागझरी गावालगत असलेल्या खदानीमध्ये 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 07.30 सुमारास नागझरी गावातील 65 वर्षाच्या ज्येष्ठ महिला शकुंतला ठाकुर ह्या कपडे धुण्यासाठी गेलेल्या असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घुण हत्या केली होती. हत्या करतेवेळेस आरोपीने शकुंतला ठाकूर त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातील यांची जबरी चोरी केली होती.      

       

याबाबत तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं.239/2020 कलम 302,394 भा. दं. वि. नोंद करण्यात आला होता. सदरच्या संवेदनशील गुन्हा उघडकिस  आण्याबाबत पोलीस आयुक्त नवी मुंबई, अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील, सा. पो आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मागर्दशनाखाली गुन्हे  शाखा युनिट 2 पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे त्यांनी समांतर तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने अतिशय गोपनीयरित्या,  कौशल्यपूर्ण तपास करून सदर तपासामध्ये 48 तासात सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विजयकुमार मुनेश्वर मंडल वय 30 मूळ राहणार नेपाळ यास गुन्हे शाखा युनिट 2 पनवेल यांनी अटक केली आहे. 

       

सदरचा आरोपी हा दहा वर्षापासून तळोजा परिसरामध्ये भंगार गोळा करून विक्री करण्याचा व्यवसाय करतो. मागील पंधरा दिवसापूर्वी मयत शकुंतला ठाकुर या खदानामध्ये कपडे धूत असताना,आरोपी इसम हा तेथे आंघोळ करीत होता.  त्यावेळी मयत महिला व आरोपी यांच्यामध्ये वाद झालेला होता. त्यावेळी मयत महिलेने आरोपीस शिवीगाळ करून दगड मारलेला होता. त्याचा राग मनात धरून आरोपीने मयत महिलेवर पाळत ठेवून तीला एकटे पाहून तिच्या अंगावरील दागिने जबरीने चोरून तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केलेली आहे. सदर संवेदनशील गुन्हा गुन्हे शाखा युनिट 2 ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे,स.पो.नि.गणेश कराड, प्रवीण फडतरे, संदीप गायकवाड, शरद ढोले, पो.ह. साळुंखे, रणजित पाटील, भोपी,पाटील यांनी 48 तासात उघडकीस आणला आहे. त्या बाबत पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी गुन्हे शाखा युनिट 2 चे आधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Bhangarwala, who murdered an old woman, was arrested by the police within 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.