काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा भारद्वाज यांचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 07:36 PM2018-10-27T19:36:10+5:302018-10-27T19:49:52+5:30

काश्मीरमध्ये निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतर राज्यात निर्माण करण्याचा सुधा भारद्वाज यांचा प्रयत्न होता, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी शनिवारी न्यायालयात दिली.

Bharadwaj's tried to create conditions like Kashmir | काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा भारद्वाज यांचा प्रयत्न 

काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा भारद्वाज यांचा प्रयत्न 

Next
ठळक मुद्देदेशातील युनिव्हर्सिटीमधील हुशार मुलांना संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे काम

पुणे : काश्मीरमध्ये निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इतर राज्यात निर्माण करण्याचा सुधा भारद्वाज यांचा प्रयत्न होता.संघटनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कुठे पाठवायचे याची जबाबदारी त्यांच्याकडे होती, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी शनिवारी न्यायालयात दिली.भारद्वाज यांना शनिवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. 
देशातील विविध युनिव्हर्सिटीमधील हुशार मुलांना संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करायचे आणि त्यांना संघटनेच्या कामासाठी गरज असलेल्या ठिकाणी पाठवण्याचे काम भारद्वाज करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. सीपीआयकडून आयएपीएलला आलेला फंड कशा पद्धतीने वापरला. संघटनेत किती विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले? ते विद्यार्थी कोण होते? त्यांना कोठे पाठवण्यात आले? याचा तपास त्यांच्याकडे करायचा आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि काश्मीरमधील देखील विद्यार्थी संघटनेत सहभागी झाले असण्याची शक्यता आहे. या सर्वांचा तपास करण्यासाठी त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील पवार यांनी न्यायाधीश किशोर वडणे यांच्याकडे केली.
बचाव पक्षाकडून अ‍ॅड. राहुल देशमुख यांनी युक्तिवाद केला. भारद्वाज यांच्याकडून यापूर्वीच सर्व प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस कोठडी घेऊन नवीन माहिती मिळण्याची शक्यता नाही. तसेच पोलिसांना काही जप्त करायचे नाही. त्यामुळे त्यांना कमीत कमी कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नजरकैद म्हणजे न्यायालयीन कोठडी नाही, नजरकैद म्हणजे काय हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही.  सुप्रीम कोर्ट नजरकैद म्हणजे काय ते ठरवेल.  त्यामुळे भारद्वाज यांना अटक करताना पोलिसांना शपथपत्र सादर करण्याची गरज नाही - जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार 

Web Title: Bharadwaj's tried to create conditions like Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.