3 लव्ह मॅरेज, कधी बनली अफसाना तर कधी अंजली; तिसऱ्या पतीने केली हत्या, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:12 PM2022-12-29T12:12:14+5:302022-12-29T12:12:30+5:30
Crime News : हत्येच्या घटनेनंतर आरोपी विनोद यानेच भव्याच्या माहेरी फोन करून सूचना दिली होती. त्यानंतर पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.
Crime News : गाझियाबादच्या भव्या शर्मा हत्याकांडाबाबत पोलिसांच्या चौकशीतून नवनवीन खुलासे होत आहेत. असं सांगण्या आलं की, भव्याने तीन लग्ने केली होती. पण तिचा तिसरा पती विनोद शर्मासोबत राहत असतानाही ती तिच्या दुसऱ्या पतीसोबत बोलत होती. याच्याच रागात विनोद शर्माने चाकूने वार करत भव्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हत्येच्या घटनेनंतर आरोपी विनोद यानेच भव्याच्या माहेरी फोन करून सूचना दिली होती. त्यानंतर पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, तरूणीच्या पोटात चाकू मारण्यात आला होता. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
आरोपी तरूणीच्या मृत्यूबाबत वेगवेगळा जबाब देत होता. त्याच्यावर पोलिसांना संशय आला. विनोदने 25 डिसेंबरला भव्याची हत्या केली होती. त्याने पोलिसांना सांगितलं की, भव्या त्याला दगा देत होती.
आरोपी विनोदने संगितलं की, भव्याचा दुसरा पती अनीशने त्याला गाझियाबाद सोडून जाण्याची धमकी दिली होती. तो म्हणाला होता की, मी असं केलं नाही तर माझा जीव जाईल. भव्या नोकरी करत होती आणि तिच्या कमाईनेच घर चालत होतं. विनोद काही कामधंदा करत नव्हता. भव्याच्या भावाने विनोद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
विनोदने सांगितलं की, हत्येच्या दिवशी दोघेही दारू प्यायले होते. यावेळी भव्याला त्याने जास्त दारू पाजली. नंतर संधी बघून त्याने भव्याच्या पोटात चाकू मारला. भव्याने काही वर्षांआधीच पोटाचं ऑपरेशन केलं होतं. त्यामुळे तिच्या पोटावर कटच्या खुणा होत्या. विनोद मुद्दाम त्याच ठिकाणी चाकूने वार केला.
भव्याने तीन लग्ने केली होती. त्यातील दोन तरूण हिंदू होत. तिघांसोबतही तिने लव्ह मॅरेज केलं होतं. भव्या आधी मुस्लिम होती. ती सीतामढीला राहत होती. पण नंतर तिचा परिवारा गाझियाबादच्या सिद्धार्थ विहारमध्ये शिफ्ट झाला. लग्नाआधी तिचं नाव बेबी होतं. पण पहिल्या लग्नानंतर तिने नाव बदलून अंजली ठेवलं. तेच दुसऱ्या लग्नावेळी तिचं नाव अफसाना आणि तिसऱ्या लग्नावेळी भव्या केलं. पहिलं लग्न 2004 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या योगेंद्र कुमार सोबत झालं होतं. दोघांना एक मुलगाही आहे. नंतर अनीशसोबत 2017 मध्ये निकाह केला. त्यानंतर तिची भेट गुरुग्रामच्या विनोद शर्मासोबत झाली. दोघांनी 2019 मध्ये लग्न केलं.