भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर यांना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:31 PM2020-01-15T22:31:42+5:302020-01-15T22:33:12+5:30
शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेधार्थ कोर्टानेही सहभाग घेण्यास बंदी घातली आहे.
नवी दिल्ली - दर्यागंज हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याला दिल्लीच्या कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर कोर्टाने आझाद यांना 16 फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन न करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेधार्थ कोर्टानेही सहभाग घेण्यास बंदी घातली आहे.
दिल्लीत यापूर्वी भीमा आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ते चंद्रशेखर आझाद यांना सोडण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. जिथे त्यांनी धरणे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, पोलिसांनी चंद्रशेखर यांना लवकरात लवकर मुक्त करावे. जामा मशिदीतून पोलिसांनी भीमा आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी दुपारी चंद्रशेखर यांना पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, लोकांना भडकावणे आणि दंगली भडकवण्यासह इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करून अटक केली. चंद्रशेखर यांच्यासह हिंसाचार पसरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १५ जणांना अटक केली होती.
Daryaganj violence case: A Delhi Court grants bail to Bhim Army Chief Chandrashekhar Azad. Court has ordered him to not hold any protest in Delhi till February 16th. (file pic) pic.twitter.com/SGFAToEHUM
— ANI (@ANI) January 15, 2020