Bhima Koragaon Case : आनंद तेलतुंबडे यांना १८ एप्रिलपर्यंत NIA कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:35 PM2020-04-14T22:35:36+5:302020-04-14T22:37:31+5:30
Bhima Koragoan Case : प्रकाश आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे, आनंद आंबेडकर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते.
मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी दक्षिण मुंबईतील कंबाला हिल येथील NIA कार्यालयात आज जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे, आनंद आंबेडकर, आमदार कपिल पाटील उपस्थित होते. यानंतर कोर्टाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत NIAच्या कोठडी सुनावली आहे.
अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिलं होतं. अलीकडेच भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने देखील १७ मार्चला त्यांच्या याचिका फेटाळल्या आणि तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्यास कोर्टाने सांगितले. नंतर ९ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने शेवटची संधी म्हणून एका आठवड्याची मुदतवाढ आत्मसमर्पण करण्यास दिली.
Bhima Koragaon Case : आनंद तेलतुंबडे यांनी एनआयएकडे केले आत्मसमर्पण
Court remands scholar and activist Anand Teltumbde to
— Press Trust of India (@PTI_News) April 14, 2020
NIA custody till April 18 in Elgar Parishad-Maoist link case