महामार्गांवर लूटमार टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी तालुका पोलिसांना यश 

By नितीन पंडित | Published: September 8, 2022 05:31 PM2022-09-08T17:31:03+5:302022-09-08T17:32:08+5:30

तब्बल 11 जणांना विविध राज्यातून केली अटक 

bhiwandi taluka police succeeds in unmasking inter state gang looting on highways | महामार्गांवर लूटमार टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी तालुका पोलिसांना यश 

महामार्गांवर लूटमार टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी तालुका पोलिसांना यश 

googlenewsNext

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: भिवंडी तालूक पोलिसांनी महामार्गावर शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळविले असून तब्बल ११ जणांना विविध राज्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे .

आठ टन तांबे घेऊन निघालेल्या ट्रक चालकावर गोळीबार करीत ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ६ ऑगष्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक जितेंद्र आगरकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलिस पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तोडासे,पो हवा काळढोक, भालेराव, भामरे, केदार, मकादम, विशे, पवार, बेलदार या पथकाने करत सुरुवातीला मुंबई मानखुर्द येथे कारवाई करीत इम्रान बन्ने खान रा.गोवंडी व मोहम्मद एजाज मोह.शमीम अन्सारी व धीरजकुमार उमेश चौधरी दोघे रा.मुज्जफरपूर बिहार यांना ताब्यात घेत एक चोरीचा ट्रक त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला.

त्यानंतर या तिघा आरोपींकडे पोलीस पथकाने कसून चौकशी केली असता या टोळीतील नवीनकुमार झा रा.नालासोपारा,नीरज बजरंग सिंग रा.सुरत,शाहिद उर्फ वसीम रमजानी मंसुरी रा.शिवडी,जॉन उर्फ जॉन मोहम्मद कलीम खान रा.नवी मुंबई,जीवन रमेश जाधव,यश महेंद्र भारती दोघे रा.सुकाळी जि.यवतमाळ,टोळीचा प्रमुख राजसिंह धनसुख गुजर रा.बिकानेर राजस्थान यास तेलंगणा येथून ताब्यात घेतले तर विनोद सहानी उर्फ बिहारी यास बिहार येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.

या टोळीच्या ताब्यातून एक ट्रक,तीन दुचाकी,एक रिक्षा अशा पाच वाहनांसह एक पिस्टल १० जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे.तर नवी मुंबई,रबाळे,एम आय डी सी महाड येथील प्रत्येकी एक तर तालुका पोलीस ठाण्यातील दोन अशा एकूण पाच गुन्ह्यांचा उलगडा केला असून इम्रान बन्ने खान, मोहम्मद एजाज मोह.शमीम अन्सारी,धीरज कुमार उमेश चौधरी यांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे,नवीनकुमार झा,नीरज बजरंग सिंग,शाहिद उर्फ वसीम रमजानी,जॉन उर्फ जॉन मोहम्मद कलीम खान,जीवन रमेश जाधव,यश महेंद्र भारती, राजसिंह धनसुख गुजर यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर विनोद सहानी उर्फ बिहारी यास बिहार येथून ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे .भिवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना एका आंतरराज्य टोळीचा सुगावा पोलिसांना लागल्याने अजून काही गुन्ह्याचा उलगडा त्यांच्या कडून होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी दिली आहे.
 

Web Title: bhiwandi taluka police succeeds in unmasking inter state gang looting on highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.