भिवंडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार करणारे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 01:49 AM2019-11-28T01:49:19+5:302019-11-28T01:49:36+5:30
भिवंडी परिसरात अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरू आहे.
भिवंडी : भिवंडी परिसरात अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या घटनेत, कुरेशीनगर, कसाईवाडा येथे ३१ वर्षीय तरु णीवर तीन महिन्यांपूर्वी दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सादीन अन्सारी आणि खालीद अन्सारी ही आरोपींची नावे आहेत. कुरेशीनगरमधील राधाबाई बिल्डिंगमध्ये पीडित तरु णी ही तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. आरोपीदेखील याच इमारतीत राहत असून, त्याच्या घराशेजारी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या मालकीची आणखी एक खोली आहे. या खोलीतील बाथरूममध्ये पीडित तरु णी अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ आटोपून ती बाथरूममधून बाहेर पडत असताना, सादीन आणि खालीद यांनी तिला बळजबरीने उचलून पुन्हा बाथरूममध्ये नेले. तिथे आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. मात्र, या मुलीमध्ये झालेले बदल आईच्या लक्षात आले. तिने विश्वासात घेऊन मुलीची चौकशी केली असता, तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे भयभीत झालेल्या आईने मुलीला निजामपूर पोलीस ठाण्यात नेऊन सादीन व खालीद या दोघांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर इंदलकर यांनी दोघांना अटक केली. बुधवारी ठाणे न्यायालयाने त्यांना ३0 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.