भिवंडीत चायनीज गाडीवरील गल्ला पळविण्याच्या वादातून तरुणाची भर रस्त्यात हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 03:55 PM2021-10-26T15:55:35+5:302021-10-26T15:55:45+5:30

मालकासह ५ जणांना अटक 

In Bhiwandi, a young man was killed on the road due to a dispute over a Chinese car | भिवंडीत चायनीज गाडीवरील गल्ला पळविण्याच्या वादातून तरुणाची भर रस्त्यात हत्या

भिवंडीत चायनीज गाडीवरील गल्ला पळविण्याच्या वादातून तरुणाची भर रस्त्यात हत्या

Next

भिवंडी- चायनीज गाडीवरील पैश्याचा गल्ला पळविण्याच्या वादातून चायनीज गाडीच्या मालकासह ५ जणांच्या टोळक्याने ३२ वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उशिरा वंजारपट्टी नाका परिसरातील मेट्रो हॉटेल जवळ असलेल्या चायनीसच्या गाडीवर घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली आहे. 

शफिक महबूब शेख( वय ३२ , रा. म्हाडा कॉलनी ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून अफजल नूरमोहम्मद सिद्धीकी (२७), अफसर नूरमोहम्मद सिद्धीकी (२६),मो. बशीर अन्सारी (२८) ,नूर मोहम्मद मकदूमबक्ष सिद्धीकी उर्फ पुरीभाजीवाला उस्ताद (६४) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपीमध्ये तिघा बाप लेकांचा सहभाग असून तिघेही भिवंडीतील नदीनाका भागात राहणारे आहेत. तर आरोपीमध्ये एक साडे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. 

आरोपी अफजल नूर मोहम्मद याचे वंजारपट्टीनाका परिसरात मेट्रो हॉटेल जवळ असलेल्या अबूजी बिल्डिंग समोर चायनीजची गाडी आहे. या गाडीवर सोमवारी रात्री उशिरा मृतक शफिक हा आला, त्यावेळी त्याने चायनीज गाडीवरील काम करणाऱ्या कारागिराशी वाद घातला. त्यांनतर गाडीवरील पैश्याचा गल्ला पळविला असता, पाचही आरोपींनी मृत शफिकला रस्त्यावरच पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीनंतर शफिकला भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे मृतक शफिकच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गोंधळ घातला होता.  या मारहाणीत शफिकचा मृत्यू  झाल्याचे समजताच परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून निजामपूर पोलिसांनी पंचनामा करीत हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी पाचही आरोपींना ताब्यात घेऊन अ

Web Title: In Bhiwandi, a young man was killed on the road due to a dispute over a Chinese car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.