भोजपुरी अभिनेता निघाला कारचोर, निर्मात्यासह करायचा चोरी, आता पोलिसांना आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:51 PM2021-03-16T20:51:24+5:302021-03-16T20:54:15+5:30

Bhojpuri actor arrested for car theft : पोलिसांनी कारचोरी तसेच नकली नोटा देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्यासह दोन जणांना अटक केली आहे.

Bhojpuri actor arrested for car theft in Delhi | भोजपुरी अभिनेता निघाला कारचोर, निर्मात्यासह करायचा चोरी, आता पोलिसांना आवळल्या मुसक्या

भोजपुरी अभिनेता निघाला कारचोर, निर्मात्यासह करायचा चोरी, आता पोलिसांना आवळल्या मुसक्या

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा केला आहे. दिल्ली पोलिसांनी कारचोरी (car theft) तसेच नकली नोटा देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्यासह दोन जणांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही कारचोरी करत असत. तसेच नकली नोटा देऊन लोकांची फसवणूक करत असत. (Bhojpuri actor arrested for car theft in Delhi )

हे प्रकरण दिल्लीतील दक्षिण पूर्व जिल्ह्यातील असून, आरोपींकडून पोलिसांनी ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यातील काही नोटा ह्या मुलांच्या खेळांमधील आहेत. दिल्लीमधील दक्षिण पूर्व जिल्ह्यातील अँटी थेफ्ट स्क्वॉडला काही सराईत चोरांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारावर या चोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

या आरोपांची ओळख राज सिंह ऊर्फ मोहम्मद शाहिद आणि सय्यद जेन हुसेन अशी पटवण्यात आली आहे. या दोघांनाही न्यू फ्रेंड्स कॉलनी येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून एक चोरलेली स्कूटी जप्त करण्यात आली. ही स्कूटी जमिया परिसरातून जप्त करण्यात आली. 

दक्षिण-पूर्वचे डीसीपी आरपी मीणा यांनी सांगितले की, राज ऊर्फ शाहिद याने अनेक भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने इलाहाबाद टू इस्लामाबाद या चित्रपटाची निर्मिती केली होती. शाहीद दिल्लीतील आश्रम परिसरात साहिल सन्नी नावाने फिल्म प्रॉडक्शन चालवतो. मात्र झटपट पैसे कमावण्याच्या नादात त्याने लोकांची फसवणूक करण्याचा धंदा सुरू केला. 

Web Title: Bhojpuri actor arrested for car theft in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.