सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 08:04 AM2020-08-07T08:04:53+5:302020-08-07T12:39:08+5:30
भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिने कधी नव्हे ते काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कलाकारांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. काल टीव्ही अभिनेता समीर शर्मा याचा मृतदेह सापडलेला असताना रात्री आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या करून जीवन संपवले.
भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिने कधी नव्हे ते काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले आहे. वृत्तसंस्था IANS ने याची माहिती दिली आहे. मुंबईतील तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. दहिसरमधील तिच्या घरी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. अनुपमा ही 40 वर्षांची अभिनेत्री एक दिवस आधीच फेसबुक लाईव्ह आली होती. तसेच तिने फॅन्ससोबत संवाद साधला होता.
फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने कोणावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. तसेच तिला कशाप्रकारे फसविण्यात आले यावरही ती बोलली आहे. अनुपमाच्या फ्लॅटमधून एक सुसाईड नोटही सापडली असून यामध्ये तिने आत्महत्येची दोन कारणे सांगितली आहेत. ''माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मी मालाडच्या विस्डम प्रोड्यूसर कंपनीमध्ये 10000 रुपये गुंतविले आहेत. कंपनी मला हे पैसे डिसेंबर 2019 मध्ये देणार होता. मात्र, आता टाळाटाळ केली जात आहे.'' अनुपमाने या चिठ्ठीमध्ये एका पत्रकाराचेही नाव घेतले आहे.
भोजपुरी एक्ट्रेस अनुपमा पाठक ने दहिसर इलाके स्थित अपने घर में कथित तौर पर की खुदकुशी। #AnupamaPathakpic.twitter.com/ve3cVosQzU
— IANS Hindi (@IANSKhabar) August 6, 2020
अनुपमा यांनी पत्रकाराने लॉकडाऊनमध्ये माझी स्कूटर घेतली होती नंतर ती परत करण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. अनुपमा यांची शेवटची फेसबुक पोस्ट 2 ऑगस्ट रात्री 12 वाजताची आहे. तिने यामध्ये बाय बाय आणि गुड नाईट लिहिले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली
आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...
Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??