एक कोटीचा बंगला, शेत अन्…; 30 हजार पगार असलेल्या इंजिनिअरकडे सापडली 7 कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 05:07 PM2023-05-11T17:07:59+5:302023-05-11T17:18:16+5:30

हेमा मीणा यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा 232 टक्क्यांनी जास्त आहेत.

bhopal lokayukta raid 7 crore property found engineer 30 thousand salary one crore bungalow farmhouse | एक कोटीचा बंगला, शेत अन्…; 30 हजार पगार असलेल्या इंजिनिअरकडे सापडली 7 कोटींची संपत्ती

फोटो - आजतक

googlenewsNext

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी पहाटे पोलीस हाउसिंग कॉर्पोरेशनची असिस्टेंट इंजिनिअर हेमा मीणाच्या भोपाळ, रायसेन, विदिशा या ठिकाणांवर छापे टाकले. याच दरम्यान, सुरुवातीच्या टप्प्यात इंजिनिअर हेमा मीणा यांची तब्बल सात कोटींची मालमत्ता उघडकीस आली आहे. आता लोकायुक्तांची कारवाई होणार आहे.

लोकायुक्त टीमचे नेतृत्व करत असलेले डीएसपी संजय शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमा मीणा हाऊसिंग कॉर्पोरेशन, भोपाळच्या असिस्टेंट इंजिनिअर म्हणून तैनात आहेत. 2020 मध्ये हेमा मीणा यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेची तक्रार प्राप्त झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

विशेष पोलीस आस्थापना भोपाळ विभाग (लोकायुक्त) भोपाळ यांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हेमा मीणा यांनी भोपाळमधील बिलखिरिया गावात 20 हजार चौरस फूट जमीन आपल्या वडिलांच्या नावाने खरेदी केली होती आणि सुमारे एक कोटी रुपये खर्च करून इमारत बांधल्याचे आढळून आले. याशिवाय भोपाळ, रायसेन, विदिशा येथील विविध गावांमध्ये शेतजमीन खरेदी केली.

हेमा मीणा यांनी हार्वेस्टर, भात पेरणी यंत्र, ट्रॅक्टर आणि इतर शेती उपकरणे खरेदी केली. लोकायुक्तांचे म्हणणे आहे की, सध्या हेमा मीणा यांचे मासिक वेतन जवळपास 30 हजार रुपये आहे. हेमा मीणा यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा 232 टक्क्यांनी जास्त आहेत. याबाबत हेमा मीना यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी भोपाळ येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर लोकायुक्त पथकाने बिलखिरिया येथील निवासस्थानासह तीन ठिकाणी कारवाई सुरू केली, ती अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत सुमारे 5 ते 7 कोटींची मालमत्ता उघडकीस आली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर एकूण मालमत्तेचे मूल्यांकन केले जाईल. एका हिेंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bhopal lokayukta raid 7 crore property found engineer 30 thousand salary one crore bungalow farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.