क्रूरतेचा कळस! Parrot चं स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने 5 वर्षीय मुलीला बेदम मारलं, मोडला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:29 PM2022-12-29T18:29:53+5:302022-12-29T18:30:10+5:30

एका ट्यूशन टीचरने पाच वर्षाच्या मुलीला एवढी मारहाण केली की तिचा हातच मोडला.

bhopal tuition teacher breaks hand of 5 yr old girl for spelling mistake arrested | क्रूरतेचा कळस! Parrot चं स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने 5 वर्षीय मुलीला बेदम मारलं, मोडला हात

क्रूरतेचा कळस! Parrot चं स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने 5 वर्षीय मुलीला बेदम मारलं, मोडला हात

googlenewsNext

मुलांना शिकवत असताना अनेकदा शिक्षक इतके कठोर होऊन जातात की त्यांच्या शिक्षेमुळे मुलं गंभीररित्या जखमी होतात. अशीच एक संतापजनक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. भोपाळमध्ये एका ट्यूशन टीचरने पाच वर्षाच्या मुलीला एवढी मारहाण केली की तिचा हातच मोडला. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 22 वर्षीय निर्दयी शिक्षकाला अटक केली. पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणाची माहिती दिली.

हबीबगंज पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर मनीष राज सिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक प्रयाग विश्वकर्माला राग आला कारण ती चिमुकली Parrot चं स्पेलिंग सांगू शकत नव्हती. त्यामुळे रागाच्या भरात त्याने चिमुकलीचा हात अशा प्रकारे मुरगळा की तो मोडेला. लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांवर काम करणाऱ्या चाइल्डलाइन या एनजीओच्या संचालिका अर्चना सहाय यांनी सांगितले की, या घटनेने मुलीच्या उजव्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे. 

मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिला गुरुवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. निरीक्षक भदौरिया यांनी सांगितले की, आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आम्ही त्याला मंगळवारी अटक केली, असे ते म्हणाले.

पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या पालकांनी त्यांच्या मुलीच्या शाळेच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी हबीबगंज येथील त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका शिक्षकाकडे मुलगी शिकण्यासाठी जात असे.मएखाद्या विद्यार्थ्यावर शिक्षकाने अशा प्रकारे राग काढल्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. गेल्या महिन्यात हरियाणातील फरिदाबाद येथील एका शाळेतही असेच एक प्रकरण समोर आले होते. 

डीपीएस स्कूल सेक्टर-11 मध्ये इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने इतकी मारहाण केली त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तो 10 मिनिटे उशिरा शाळेत पोहोचल्याचे पीटीआय शिक्षक लोकेश याने त्याला खूप मारहाण केली. यानंतर त्या विद्यार्थ्याची प्रकृती हळूहळू खालावत गेली आणि त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bhopal tuition teacher breaks hand of 5 yr old girl for spelling mistake arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.