बिहारमध्ये भीषण अपघात, ट्रकने अनेकांना चिरडले; 15 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:31 PM2022-11-20T23:31:27+5:302022-11-20T23:31:52+5:30

अपघातानंतर ट्रक समोरील पिंपळाच्या झाडावर जाऊन आदळला आहे. चालक ट्रकमध्येच अडकला असल्याचे सांगितले जात आहे.

Big accident in Bihar, truck crushes many People; 15 killed | बिहारमध्ये भीषण अपघात, ट्रकने अनेकांना चिरडले; 15 ठार

बिहारमध्ये भीषण अपघात, ट्रकने अनेकांना चिरडले; 15 ठार

googlenewsNext

हाजीपूर : बिहारच्या वैशालीमध्ये भीषण अपघात घडला आहे. एक अनियंत्रित ट्रकने अनेक लोकांना चिरडले आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून अधिकृत आकडा आलेला नाही. अपघातानंतर घटनास्थळी धावपळ उडाली होती. 

महनार-हाजीपूर मुख्य मार्गावर हा अपघात झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरु करण्य़ात आले आहे. 
महनार मोहद्दीनगर एसएचवरील ब्रह्मस्थानाजवळ लोक भुइयां बाबाची पूजा करत होते. यावेळी रस्त्यावर उभ्य़ा असलेल्या लोकांना ट्रकने चिरडले. यामध्ये १० ते १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

अपघातानंतर ट्रक समोरील पिंपळाच्या झाडावर जाऊन आदळला आहे. चालक ट्रकमध्येच अडकला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ट्रकच्या केबिनमध्ये देखील काहीजण अडकले आहेत. अपघातानंतर अटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. ट्रक चालक नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले. 

Web Title: Big accident in Bihar, truck crushes many People; 15 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.