एटीएसची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी दिल्लीतून जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 07:57 PM2021-08-18T19:57:47+5:302021-08-18T20:00:04+5:30

ATS arrested Drug smuggler : एटीएसचा ससेमिरा मागे लागताच शहाने मुंबईतून पळ काढत, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, कर्नाटक मध्ये ओळख लपवून राहत होता. 

Big action of ATS! The main accused in international drug smuggling was arrested from Delhi | एटीएसची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी दिल्लीतून जेरबंद

एटीएसची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी दिल्लीतून जेरबंद

Next
ठळक मुद्देशहा हा शेअर मार्केट घोटाळ्यातील म्होरक्या हर्षद मेहता याचा देखील सहकारी होता.  आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी निरंजन जयंतीलाल शहा याला दिल्लीतून अटक

मुंबई : आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीतील मुख्य आरोपी निरंजन जयंतीलाल शहा याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस)  ही कारवाई केली आहे. शहा हा शेअर मार्केट घोटाळ्यातील म्होरक्या हर्षद मेहता याचा देखील सहकारी होता. 

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोज़ी एटीएस जुहू युनिटने केलेल्या कारवाईत सोहेल यूसुफ मेमन याला अडीच कोटी किंमतीच्या ५ किलो ६५ ग्रँम एमडीसह बेडया ठोकण्यात आल्या होत्या. चौकशीत मेमनने हे ड्रग्ज शहा कड़ून घेतल्याचे समोर आले. तेव्हापासून शहा एटीएसच्या रडारवर होता. पुढे शहा हा मुंबई, दिल्लीतील विविध पोलीस ठाणे तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, महसुल गुप्तचर यंत्रणाही त्याच्या मागावर असल्याचे समोर आले. 

एटीएसचा ससेमिरा मागे लागताच शहाने मुंबईतून पळ काढत, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हैद्राबाद, कर्नाटक मध्ये ओळख लपवून राहत होता.  दरम्यान दिल्लीतील मनरेका गावात तो असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार एटीएसच्या जुहू पथकाने त्याला मंगळवाऱी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २५ तारखेपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावली आहे. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Big action of ATS! The main accused in international drug smuggling was arrested from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.