मोठी कारवाई! बक्षीहिप्परग्यातील हातभट्ट्या उध्वस्त, कारमधून वाहतूक होणारा विदेशी मद्यसाठा जप्त

By Appasaheb.patil | Published: December 6, 2022 04:37 PM2022-12-06T16:37:11+5:302022-12-06T16:37:41+5:30

या कारवाईत जवळपास ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हातभट्टीने भरलेले बॅरल कोयत्याने फोडून उध्वस्त करण्यात आले आहे.

Big action Hand kilns in Bakshihipparga destroyed, stock of foreign liquor transported in cars seized | मोठी कारवाई! बक्षीहिप्परग्यातील हातभट्ट्या उध्वस्त, कारमधून वाहतूक होणारा विदेशी मद्यसाठा जप्त

मोठी कारवाई! बक्षीहिप्परग्यातील हातभट्ट्या उध्वस्त, कारमधून वाहतूक होणारा विदेशी मद्यसाठा जप्त

Next

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर येथील पथकाने ६ डिसेंबर रोजी मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पहाटेच्या सुमारास वेशांतर करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा येथे धाड टाकली. या कारवाईत जवळपास ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हातभट्टीने भरलेले बॅरल कोयत्याने फोडून उध्वस्त करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग, ब विभाग व भरारी पथकाने बक्षीहिप्परगा तांडा येथील सेवा तांड्यावर छापा टाकला. यात नवनाथ खेमा राठोड याच्या घरातून ८ रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली ६४० लिटर, तर द्वारकाबाई कोंडीबा राठोड (रा. सेवा तांडा) हिच्या घरातून २२ रबरी ट्यूबमधून २२०० लिटर हातभट्टी दारु जप्त केली. 

याशिवाय, या पथकाने गणपत तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून, विजय मानसिंग चव्हाण व संजय थावरु पवार यांच्या ताब्यातील हातभट्टी दारु तयार करण्याकरीता लागणारे ३६ प्लास्टीकच्या बॅरेलमध्ये साठवणूक केलेले गुळमिश्रित रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन हजार आठशे चाळीस लिटर हातभट्टी दारू आणि सात हजार दोनशे लिटर रसायन, असा एकूण ३ लाख सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सूरज कुसळे, संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, शंकर पाटील, उषाकिरण मिसाळ, सुनिल पाटिल, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, सिद्धराम बिराजदार, गजानन होळकर, जवान गणेश रोडे, विकास वडमिले, मलंग तांबोळी, भाग्यश्री शेरखाने, प्रियंका कुटे, अनिल पांढरे, अण्णासाहेब कर्चे, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख, रामचंद्र मदने व मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.

कारमधून वाहतूक होणारा मद्यसाठा जप्त -
मोहोळ तालुक्यातील खंडाळी ते खंडाळी पाटी रोडवरून कारमधून वाहतूक होणारा मद्यसाठा जप्त करण्यात एक्साईज विभागाला यश आले आहे. याप्रकरणी वाहनचालक बालाजी बबन खडके (रा. टेंभुर्णी ता. माढा) यास जागीच ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन्ही वाहनासह एकूण ६ लाख २ हजार ७८० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील दुसरा आरोपी सचिन बनसोडे हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
 

Web Title: Big action Hand kilns in Bakshihipparga destroyed, stock of foreign liquor transported in cars seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.