Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनवर मोठी अ‍ॅक्शन, अनेकांवर लटकलीय अटकेची तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 07:59 PM2022-08-27T19:59:35+5:302022-08-27T20:01:18+5:30

पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स पेडरला (आरोपींना) अटक करण्यात आली आहे. ड्रग्स सापडलेल्या ठिकाणच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.

Big action on drugs connection in Sonali Phogat murder case sword of arrest hanging on many people | Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनवर मोठी अ‍ॅक्शन, अनेकांवर लटकलीय अटकेची तलवार

Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनवर मोठी अ‍ॅक्शन, अनेकांवर लटकलीय अटकेची तलवार

Next

सोशल मीडिया स्टार आणि भाजप नेता सोनाली फोगाटच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन आल्याने पोलिसांच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. यातच, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी अंजुनामध्ये कर्लिज बीच शैकचा मालक एडविन नून्स आणि एक संशयित ड्रग्स तस्कर दत्तप्रसाद गावकरला अटक केली आहे. यानंतर आतापर्यंत या प्रकरणात एकूण चार जणांना अटक झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या प्रकरणात आणखीही काही लोकांना अटक होऊ शकते. 

ड्रग्स पेडलरला अटक -
पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स पेडरला (आरोपींना) अटक करण्यात आली आहे. ड्रग्स सापडलेल्या ठिकाणच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. अनेक पथके या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ते म्हणाले, कुटुंबाने केलेले काही आरोप आणि उपस्थित केलेल्या शंकांची पडताळणी करण्यासाठी आम्ही एक चमू हरियाणालाही पाठवणा आहोत. कारण त्या शंकांचा तपासावरही परिणाम होईल. याच बरोबर, तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

एनडीपीएस अधिनियमांतर्गत कारवाई - 
जसपाल सिंह यांनी सांगितले, की याप्रकरणात आधी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंह यांना अटक करण्यात आली होती. यांनी आपण गावकर कडून मादक पदार्थ घेतल्याचे कबूल केले होते. गावकर आणि एडविनवर एनडीपीएस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी असे दिसून येते, की गावकरने सांगवान याला मादक पदार्थ विकले होते आणि सिंहने पार्टीदरम्यान ते फोगाटला दिले. रेस्टॉरन्ट परिसरात ही घटना घडल्याने एडविनला अटक केली आहे.

सांगवान आणि सिंह यांची अडचण वाढली -
फोगाट (42) ला 23 ऑगस्टच्या सकाळी उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेतच आणण्यात आले होते. गोव्यातील एका न्यायालयाने शनिवारी सांगवान आणि सिंह यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Big action on drugs connection in Sonali Phogat murder case sword of arrest hanging on many people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.