मोठी कारवाई! तब्बल १३० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:23 PM2022-03-16T18:23:48+5:302022-03-16T18:24:24+5:30
Police seize drugs worth Rs 130 crore : यामध्ये आसाम पोलिसांनी ४. ६ लाख YABA गोळ्या, १२ किलो आईस क्रिस्टल, १.५ किलो हेरॉइन जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे १३० कोटी रुपये आहे.
आसाम - अमली पदार्थांविरुद्धच्या मोहिमेत आसामपोलिसांना मोठं यश मिळालं असून तब्बल १३० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये आसाम पोलिसांनी ४. ६ लाख YABA गोळ्या, १२ किलो आईस क्रिस्टल, १.५ किलो हेरॉइन जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे १३० कोटी रुपये आहे.
याप्रकरणी शेजारच्या राज्यातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. या जप्तीप्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.
#AssamAgainstDrugs
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) March 16, 2022
Another major success by @assampolice!
In a major op led by Bibekananda Das, ADCP East & Nabajit Nath, OC Sonapur, 4.6 lakh Yaba tablets, 12 kg Metamphetamine and 1.5 kg Heroin have been seized. Two accused apprehended.
Good work! Keep it up @GuwahatiPol. pic.twitter.com/TqNeJRK4Oj
“बिबेकानंद दास, एडीसीपी पूर्व आणि नबजित नाथ, ओसी सोनापूर यांच्या नेतृत्वाखालील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये ४.६ लाख याबा गोळ्या, १२ किलो मेटाम्फेटामाइन आणि १.५ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दोन आरोपींना पकडले,” अशी माहिती देणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले.
गुवाहाटी आओगे,
— Hardi Singh (@HardiSpeaks) March 16, 2022
तो हमसे बच ना पाओगे !@GuwahatiPol pulls of the biggest ever drug bust.
Narcotics worth ₹130+ crores on the street, intercepted, last night.
Bit by bit, we @assampolice are breaking the back of Narco trafficking in the region. #WarAgainstDrugshttps://t.co/QCTnlXVe8k