रेल्वे विभागातील मोठी कारवाई! १ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना केली अटक
By पूनम अपराज | Published: January 17, 2021 06:09 PM2021-01-17T18:09:56+5:302021-01-17T18:11:31+5:30
Bribe Case : नोकरी देण्याचं आमिष दाखवून घेतले १ कोटी
सीबीआयने महेंद्र सिंह चौहान या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याला १ कोटींची लाच घेताना अटक केली आहे. या अधिकाऱ्यासह अन्य दोघांना देखील सीबीआय बेड्या ठोकल्या आहेत. यांच्याजवळून १ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. १९८५ च्या बॅचचे अधिकारी असलेले महेंद्र सिंहला लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागात एवढी मोठी रक्कम लाच म्हणून घेण्यात आलेलं हे पाहिलंच प्रकरण आहे. अधिकाऱ्याने नॉर्दन ईस्टर्न फ्रंटियर रेल्वेजमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून लाच मागत होता. सीबीआयने पाच राज्यात २० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली .
CBI arrests a senior railway engineering service officer along with two others for allegedly demanding a bribe of Rs 1 crores. Searches underway at 20 locations in five states: CBI official
— ANI (@ANI) January 17, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने १ कोटी लाच घेण्याच्या आरोपाखाली महेंद्र सिंह चौहानला अटक केली आहे. महेंद्र सिंह चौहानविरोधात नॉर्दन ईस्टर्न फ्रंटियर रेल्वेमध्ये एका खाजगी कंपनीला काम देण्याचे आमिष देऊन लाच मागितल्याचा आरोप आहे. ज्या इतर दोन लोकांना अटक केली आहे. त्यांनी महेंद्रच्या नवे लाच स्वीकारली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, अशी माहिती माहिती होती की, महेंद्र सिंह चौहान पूर्वोत्तर रेल्वेमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली एका खाजगी कंपनीकडून १ कोटी रुपयांची लाच मागत आहे. त्यानंतर सीबीआयने जाळं टाकलं आणि महेंद्रसह त्याच्या दोन साथीदारांना लाच घेताना अटक केली.