मोठी कारवाई! बॉम्बस्फोटातील फरार दहशतवाद्याला कानपूरमधून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 05:51 PM2020-01-17T17:51:08+5:302020-01-17T18:06:44+5:30

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता.

Big action! From Uttar Pradesh arrested for absconding terrorist | मोठी कारवाई! बॉम्बस्फोटातील फरार दहशतवाद्याला कानपूरमधून घेतले ताब्यात

मोठी कारवाई! बॉम्बस्फोटातील फरार दहशतवाद्याला कानपूरमधून घेतले ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देतो फरार झाल्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. ५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता.महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून जलीलला ताब्यात घेतले. 

मुंबई - राजस्थानच्या अजमेर येथील बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला फरार दहशतवादी डॉ.मोहम्मद जलीस शफी उल्ला अन्सारीला (६८) महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून ताब्यात घेतले आहे. हा फरार आरोपी पॅरोलवर असताना फरार झाला आहे. मुंबईतील आग्रीपाडा येथीस मोमीन पाडाच्या बीआयटी चाळीत तो कुटुंबियांसोबत रहात होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.कुख्यात दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला कानपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

५० पेक्षा जास्त बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला डॉ. बॉम्ब म्हणून देखील ओळखतात. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही त्याचा सहभाग होता. त्यामुळे तो फरार झाल्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. 


कोण आहे डॉ. जलील अन्सारी ?
मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जलील अन्सारीने बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर करीम तुंडाच्या संपर्कात येऊन नव्वदीच्या शतकात पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर बॉम्ब बनवण्यामध्ये नैपुण्य मिळवले. १९९२ साली राजस्थानच्या अजमेर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. अजमेर ब्लास्टमधील त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोर्टाने त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी दहशतवादी जलीस अन्सारी फरार

नुकताच ६८ वर्षीय जलील २१ दिवसांचा पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल मंजूर झालेल्या अन्सारीला दर दिवशी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात १०.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान हजेरी लावण्याच्या अटीवर पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मात्र, १६ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घरातून नमाज पठण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो अचानक गायब झाला. अन्सारीचा शोध न लागल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यांमध्ये तो गायब झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जलील अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने कानपूर येथून जलीलला ताब्यात घेतले. 

 

Web Title: Big action! From Uttar Pradesh arrested for absconding terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.