हनीप्रीतला मोठा दिलासा; पंचकुला कोर्टाने केला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 05:12 PM2019-11-06T17:12:40+5:302019-11-06T17:14:54+5:30
हनीप्रीतला कोर्टाने जामीन देऊन मोठा दिलासा दिला आहे.
नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमची जवळची सहकारी असलेल्या हनीप्रीतला पंचकुला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तसेच तिच्याविरोधातील हिंसाचार भडकविल्याचा आरोप देखील कोर्टाने रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे हनीप्रीतला कोर्टाने जामीन देऊन मोठा दिलासा दिला आहे.
बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी तसेच जवळची सहकारी प्रियंका तनेजा ऊर्फ हनीप्रीत इन्सा तुरूंगात होती. राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसा भडकविण्याच्या आरोपात हनीप्रीत अटक केली असून तिची कसून चौकशी करण्यात आली. पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविल्याप्रकरणी २०१७ साली हनीप्रीतला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून ती अंबाला कारागृहात होती. पंचकुलात हिंसाचार पसरविण्याच्या आरोपातून तिला कोर्टाने मुक्त केले आहे.
मात्र, अंबाला तुरूंगात असलेल्या हनीप्रीतला तेथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. हनीप्रीतला तुरूंगातील जेवण आवडत नसल्याने तिला घरी बनवलेलं जेवण तुरूंगात दिलं जातं. तसंच तुरूंगातील उच्च सुरक्षा केंद्रात हनीप्रीतच्या कुटुंबीयांची गाडी यायला तुरूंग अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्याचा आरोप केला जात होता.
नवी दिल्ली - डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या सहकारी हनीप्रीत यांना पंचकुला कोर्टाने केला जामीन मंजूर https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) November 6, 2019
Haryana: Dera Sacha Sauda Chief Gurmeet Ram Rahim's close aide Honeypreet, accused of inciting violence in Panchkula in 2017, granted bail by a Panchkula Court, today. She had moved her plea on Wednesday, 4 days after court dropped sedition charges against her.(File Pic) pic.twitter.com/nTICPMTw5I
— ANI (@ANI) November 6, 2019