मोठा अनर्थ टळला! विमानात फोनवर स्फोट घडवून आणण्याबाबत बोलणाऱ्या तरुणास घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 12:27 PM2018-11-26T12:27:01+5:302018-11-26T12:29:23+5:30
9W0472 हे जेट तो उडवून टाकण्याबाबत ताब्यात असलेला आरोपी कोणा व्यक्तीशी बोलत होता. त्यामुळे हा नेमका कोणाशी बोलत होता, यासंदर्भात आता पोलीस तपास करत आहेत.
कोलकत्ता - आज सकाळी जेट एअरवेजच्या फ्लाइटमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर प्रवाशांसह हा तरुण कोलकत्त्यावरून मुंबईला येणाऱ्या जेट एअरवेजमध्ये प्रवास करत होता. दरम्यान विमान उडण्याआधी या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. २१ वर्षीय वेदांत पोद्दार असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने चेहऱ्यावर काळा कपडा बांधला होता आणि विमानात स्फोट घडवून आणण्याबाबत तो समोरील व्यक्तीशी फोनवर बोलत होता. त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
9W0472 हे जेट तो उडवून टाकण्याबाबत ताब्यात असलेला आरोपी कोणा व्यक्तीशी बोलत होता. त्यामुळे हा नेमका कोणाशी बोलत होता, यासंदर्भात आता पोलीस तपास करत आहेत. ज्या नंबरवर तो बोलत होता त्याची चौकशी पोलीस करत आहेत. सकाळी 8:15 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर विमानात काही संशयास्पद वस्तू आहे का हे पाहण्यासाठी संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली.
A passenger J Poddar travelling on Kolkata-Mumbai Jet Airways flight was apprehended at Kolkata airport by CISF today .He was reportedly speaking on the phone threatening to blow up the plane
— ANI (@ANI) November 26, 2018