पीएफआयच्या त्या पाच संशयितांच्या बँक खात्यात मोठी आर्थिक उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 08:58 PM2022-10-02T20:58:54+5:302022-10-02T20:59:30+5:30

न्यायालय: आरोपींच्या एटीएस कोठडीची मुदत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढविली

Big financial turnover in the bank account of those five suspects of PFI of Aurangabad | पीएफआयच्या त्या पाच संशयितांच्या बँक खात्यात मोठी आर्थिक उलाढाल

पीएफआयच्या त्या पाच संशयितांच्या बँक खात्यात मोठी आर्थिक उलाढाल

googlenewsNext

औरंगाबाद : देशविरोधी कारवायात गुंतल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेल्या (एटीएस)पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय)च्या पाच संशयित पदाधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीची मुदत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाने रविवारी दिला.

शेख इरफान शेख सलीम उर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७,रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील(२८,रा. रोजेबाग),परवेज खान मुजम्मील खान (२९,रा. जुना बायजीपुरा),हादी अब्दुल रऊफ(३२,रा. रहेमान गंज, जालना) आणि शेख नासेर शेख साबेर (३७,रा. बायजीपुरा)अशी पोलीस कोठडी वाढविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला विदेशातून फंड मिळत आहेत. शिवाय भारताला मुस्लीम राष्ट्र बनविण्यासाठी ही संघटना देशभर काम करीत असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) आणि इंटेलिजन्स ब्युरो(आय.बी.) आणि दहशतवाद विरोधी पथक(एटीएस) या संस्थांना मिळाली होती. तेव्हापासून केद्रीय तपास यंत्रणांसह एटीएसचे अधिकारी पीएफआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते.

दरम्यान २३ सप्टेंबरच्या रात्री केंद्रीय तपास यंत्रणासह एटीएसने देशभर ऑपरेशन राबवून संशयितांची धरपकड केली होती. औरंगाबाद एटीएस पथकाने शहरातील चार आणि जालना येथील एक अशा एकूण पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २ ऑक्टोबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत आज संपल्याने एटीएसने सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयास सांगितले की, संशयितांच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली. शिवाय त्यांची कसून चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सर्वच आरोपींच्या बँक खात्यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेच्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आरोपींपैकी एक शेख इरफान ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली हा पीएफआयच्या राज्य कार्यकारीणीचा सदस्य आहे. त्याच्या घरातून एक तलवार जप्त केली. शिवाय त्याचा मोबाइल, लॅपटॉप आणि हार्डडिस्क हस्तगत केल्या असून त्यातील डाटा रिक्वर करण्यासाठी ते फॉरेन्सिकला पाठविले आहेत. त्याच्या घरातील विविध पुस्तके आढळून आली असून बाबरी मशिद नही भुलेंगे असे लिहिलेले काही साहित्य लिखान आढळले. विविध बँकामध्ये अकाऊंट आहेत. त्यापैकी बँक ऑफ बडोद्याचे खाते एनआयए ने सील केले आहे. आरोपी सय्यद फैजलने केरळमधून प्रशिक्षण घेतलेले आहेत. तो पीएफआयच्या वतीने बंद शेडमध्ये बीड आणि जालन्यातील ठराविक व्यक्तींना शारिरिक प्रशिक्षण देत असल्याचे एटीएसने न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले.आरोपी अब्दुल हादीच्या घरझडतीत १९ हस्तलिखीत साहित्य जप्त केली आहेत. त्यात इस्लामीक स्टेट बनविण्याचे उद्देशाने प्रत्येक व्यक्तीला एक ध्येय (मिशन) दिले गेले होते. ज्यात फंड गोळा करणे, खाजगी ट्रस्ट तयार करणे आदी बाबींचा यात उल्लेख असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपी परवेज हा देखील याने पडेगाव आणि नारेगाव येथील निर्जनस्थळावरील बंद शेडमध्ये तरूणांना ट्रनिंग देत होता. १५ सप्टेंबर रोजी मडगाव (गोवा) आणि माहराष्ट्र राज्यात झालेल्या पीएफआयच्या महत्वाच्या बैठकीत हजर असल्याचे अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर अधिक तपास करण्यासाठी त्यांची कोठडीची गरज असल्याचे सांगितले. आरोपींच्या वकिलांनी हा युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत दोन दिवस वाढ केली.

राज्यअध्यक्षाच्या इशाऱ्यावर चालायचे काम
आरोपी पीएफआयचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असून त्याच्याच इशाऱ्यावर अन्य आरोपी काम करीत आल्याचे चौकशीत समोर आले. एनआयने त्याचे बँक खाते सील केले असून खात्यात १लाख ८० हजार रुपये असल्याचे समोर आले.

Web Title: Big financial turnover in the bank account of those five suspects of PFI of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.