NCB च्या जाळ्यात अडकला मोठा मासा; तस्करीत मदत करणारी नायजेरियन व्यक्तीलाही बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:35 PM2021-07-08T21:35:07+5:302021-07-08T21:35:58+5:30
Drug Case : NCBच्या मुंबई कार्यालयाने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मीरारोड परिसरातून अटक केली आहे.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीकडून सातत्याने ड्रग्ज तस्करांविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. एनसीबीने मुंबईतून अनेक ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. NCBच्या मुंबई कार्यालयाने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मीरारोड परिसरातून अटक केली आहे.
सुफियान देशात अनेक ठिकाणी विमान प्रवासाच्या अनेक साहित्यातून छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी करायचा. त्याच्या चौकशीतून तस्करीत त्याला मदत करणाऱ्या एका नायजेरियन तरुणालाही NCBने बेड्या ठोकल्या आहे. या नायजेरियन तस्कराला पकडण्यासाठी NCB च्या अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाचे वेशांतर केले. या नायजेरियन तस्कराकडून NCBने मोठ्या प्रमाणात एमडी आणि कोकेन हे ड्रग्ज जप्त केले आहेत.
सुफियान हा भारतातील अनेक उच्चभ्रू व्यक्तींना ड्रग्ज पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यक्तींमध्ये काही बॉलीवूडमधील तारकांचीही नावे आहेत. सुफीयानने या तस्करीतून बक्कळ पैसे कमावले होते. सध्या तो मीरारोडच्या उच्चभ्रूवस्तीत राहतो.