Breaking : नितेश राणेंना मोठा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 06:05 PM2022-02-02T18:05:30+5:302022-02-02T18:18:14+5:30
Nitesh Rane remanded Police custody for 2 days : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती आणि आज कणकवली न्यायालयासमोर नितेश राणे शरण आले आहेत. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता नितेश राणेंना दोन दिवस पोलीस कोठडीत रात्र काढावी लागणार आहे. आमदार नितेश राणे यांचा मुक्काम ओरोस जिल्हा पोलीस मुख्यालय येथे असणार आहे. चौकशीसाठी फक्त कणकवली पोलिस ठाण्यात आणतील. भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आहे. कणकवली दिवाणी न्यायालायने हा निर्णय दिला आहे.
कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत आमदार नितेश राणेंसह अन्य संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
नितेश राणे अखेर शरण जाणार; पोलीस चौकशीसाठी तयार असल्याची वकिलांची माहिती
आमदार नितेश राणे यांची गाडी अडवल्यामुळे पोलीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक बनत पोलिसांशी हुज्जत घातली. नितेश राणे हे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवला आहात, असा सवालही त्यांनी पोलिसांना केला. मात्र, आज या प्रकरणात उलट चित्र पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांचा उच्च न्यायालयासमोरील जामीन अर्ज एका निवेदनासह मागे घेण्यात आला आहे. या निवेदनात नितेश राणे पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती दिली होती. सुप्रीम कोर्टाकडून १० दिवसांचे अटकेपासून संरक्षण मिळाले होते. आणखी 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली होती.