मोठी बातमी! २० हजारांच्या लाचेची मागणी करणारा माढ्यातील भूकरमापक अटकेत
By Appasaheb.patil | Published: March 1, 2023 05:45 PM2023-03-01T17:45:14+5:302023-03-01T17:46:13+5:30
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या ...
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात लोकसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
प्रशांत भारतराव कांबळे (वर्ग ३, ) असे ताब्यात घेतलेल्या भूकरमापकाचे नाव आहे. दरम्यान, तक्रारदार यांची मौजे रोपळे (क) येथील गट नं ५४५ वरील शेत जमिनीची मोजणी झाल्यानंतर सदर जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशा वर उपअधीक्षक यांची सही घेऊन देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, माढा येथील भूकरमापक प्रशांत कांबळे यांनी २० हजार लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदाराकडे शेतजमिनीच्या जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशावर उपअधीक्षकांची सही घेऊन देण्यासाठी २० हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, ही कारवाई सहा. पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पकाले, किणगी, उडाणशिव यांच्या पथकाने केली.