मोठी बातमी: गुजरातमध्ये तब्बल ४८० कोटींचा ड्रग्सचा साठा पकडला, सहा पाकिस्तानींना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:25 PM2024-03-12T17:25:50+5:302024-03-12T17:27:35+5:30
पोरबंदरच्या जवळ एका बोटीत ८० किलो ड्रग्स घेतले ताब्यात
6 Pakistani arrested, 480 crores drugs seized: भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएस आणि एनसीबी यांनी अरबी समुद्रात मोठी कारवाई केली. भारताने अंमली पदार्थांच्या व्यापाराला मोठा धक्का दिला आहे. या संयुक्त कारवाईत सहा पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह पकडण्यात आले. NCB च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांकडून ४८० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना पोरबंदरमध्ये ठेवण्यात आले आहे. NCBने या संयुक्त कारवाईबाबत सांगितले.
In an overnight joint operation on 11th and 12th March, the Indian Coast Guard, apprehended a Pakistani Boat with 6 crew onboard and around 80 Kg of drugs worth approx Rs 480 crores. The boat was apprehended about 350 Km from Porbandar into the Arabian Sea in a sea-air…
— ANI (@ANI) March 12, 2024
अधीक्षक सुनील जोशी यांनी या संयुक्त कारवाईबाबत माहिती दिली की, एका गुप्त माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ अरबी समुद्रात संयुक्त कारवाई केली. ११-१२ मार्चच्या रात्री ही मोहीम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोरबंदरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर अरबी समुद्रात समन्वित सागरी-हवाई ऑपरेशनमध्ये भारतीय तटरक्षक जहाजे आणि डॉर्नियर विमानाने ही बोट अडवली, असे ते म्हणाले. त्यानंतर बोटीतून पाकिस्तानी सहा क्रू मेंबर आणि 80 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या औषधांची किंमत 480 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या एका महिन्यात अरबी समुद्रात एजन्सींनी राबवलेली ही दुसरी मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई आहे, असेही ते म्हणाले. २६ फेब्रुवारी रोजी पोरबंदर किनाऱ्यावर पाच परदेशी नागरिकांना ३,३०० किलो चरससह अंमली पदार्थांसह पकडण्यात आले होते. तसेच एटीएस गुजरात आणि एनसीबी यांच्या संयुक्त विद्यमाने तटरक्षक दलाने गेल्या तीन वर्षांत केलेली ही दहावी अटक आहे. या कारवाईंतर्गत 3,135 कोटी रुपयांचे 517 किलो अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.