मोठी बातमी! NSE फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांना ईडीकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 08:25 PM2022-07-19T20:25:59+5:302022-07-19T20:37:27+5:30
Sanjay Pandey arrested : आता संजय पांडे यांना अटक केल्याने खळबळ माजली आहे.
पूनम अपराज
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १४ जुलैला अटक केली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांना अटक केल्याने खळबळ माजली आहे.
ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि संजय पांडे यांच्यावर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने गुन्हा दाखल केल्यानंतर एका आठवड्यानंतर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
— ANI (@ANI) July 19, 2022
(File Pic) pic.twitter.com/KkJJwvSPD4
एफआयआरमध्ये काय आरोप आहेत?
लाइव्ह मिंटमधील वृत्तानुसार, नुकत्याच नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांना मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या iSEC या कंपनीचा शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे इंटरसेप्ट करण्यासाठी समावेश करण्यात आला होता. एफआयआरमध्ये असेही आरोप करण्यात आले होते की, संजय पांडे यांच्या कंपनीला स्टॉक एक्स्चेंज कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याबद्दल 4.45 कोटी रुपये देण्यात आले होते.