Sameer Wankhede: मोठी बातमी! एनसीबीच्या समीर वानखेडेंमागे पोलिसांचे गुप्तहेर? DGP कडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:09 PM2021-10-11T22:09:09+5:302021-10-11T22:17:34+5:30
NCB's Sameer Wankhede snooped by Mumbai Police: आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गेल्या आठवड्यात मुंबई समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (mumbai cruise rave party case)
एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपी यांच्याकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. ओशिवारा पोलासांनी स्मशान घाटावर जात समीर वानखेडे यांची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासून ते रोज या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे.
Mumbai: Narcotics Control Bureau (NCB) officials met senior officials of Mumbai Police and complained to them about being followed by Mumbai Police officials in the past few days.
— ANI (@ANI) October 11, 2021
या क्रूझ पार्टीमध्ये शाहरुखचा मुलगा सापडल्याने ही हाय प्रोफाईल केस बनली आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीची टीम यावर काम करत आहे. चार्जशीट फाईल करण्यासाठी एनसीबीकडे ६ महिन्यांचा वेळ आहे. यामुळे वानखेडेंचा य़ेथील सेवा कालावधी सहा महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यांना दुसऱ्यांदा एक्स्टेंशन मिळाले आहे.
समीर वानखेडेंनी गेल्या दोन वर्षांत १७ हजार कोटींचे ड्रग्ज आणि रॅकेट पकडली आहेत. गेल्या वर्षीच वानखेडे यांना डीआरआयहून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली करण्यात आली होती.