बनावट आधार कार्ड तयार करून सिम कार्ड विकणारे मोठे रॅकेट उघडकीस
By अण्णा नवथर | Published: July 14, 2023 03:54 PM2023-07-14T15:54:03+5:302023-07-14T15:54:52+5:30
मुंबई येथील सायबर पोलिसांनी बनावट आधार कार्ड तयार करून सिम कार्डची विक्री करणाऱ्या राज्यभरातील 72 वितरकांची नावे शोधून काढली आहेत.
अहमदनगर : बनावट आधार कार्ड तयार करून सिम कार्डची विक्री करणारी करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, राज्यभरातील 72 वितरकांनी बनावट आधार कार्ड तयार करून हजारो सिम कार्डचे वाटप केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या वितरकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मुंबई येथील सायबर पोलिसांनी बनावट आधार कार्ड तयार करून सिम कार्डची विक्री करणाऱ्या राज्यभरातील 72 वितरकांची नावे शोधून काढली आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दोन वित्तरकांचा समावेश असून ,यासंदर्भात नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात तसेच पाथर्डी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील एका मोबाईल शॉपी चालकास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. त्याने कंपनीकडून मिळणाऱ्या कमिशन साठी बनावट आधार कार्ड तयार करून सिम कार्ड विकले असल्याची माहिती कबुली दिली आहे. अशा पद्धतीने राज्यातील 72 वितरकांनी बनावट आधार कार्ड तयार करून सिम कार्ड चे वितरण केले असल्याचे तपासात समोर आले आहे , अशी माहिती लोकांना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.