सुरज पंचोलीला मोठा दिलासा! जिया खान आत्महत्याप्रकरणी याचिका फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:37 PM2021-09-17T15:37:41+5:302021-09-17T15:49:50+5:30

Jiah Khan Case : जियाची आई गेली ८ वर्षे न्यायासाठी लढा देत आहे. पण आजच्या काळात कोणीही तिच्या पाठीशी उभे राहत नाही. जिया खानने मनोरंजन विश्वात खूप कमी वयात नाव कमावले होते.

Big relief to Suraj Pancholi! Jiah Khan's suicide case rejected petition | सुरज पंचोलीला मोठा दिलासा! जिया खान आत्महत्याप्रकरणी याचिका फेटाळली 

सुरज पंचोलीला मोठा दिलासा! जिया खान आत्महत्याप्रकरणी याचिका फेटाळली 

Next
ठळक मुद्देजियाच्या कुटुंबीयांनी सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणावर आधीच खटला सुरू आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सूरज पंचोलीला सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. किंबहुना, जिया खान आत्महत्या प्रकरणात पुढील तपासासाठीच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ही याचिका जियाची आई आणि सीबीआयने दाखल केली होती, जी न्यायालयाने मंजूर केलेली नाही. जियाच्या कुटुंबीयांनी सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणावर आधीच खटला सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, सीबीआयच्या टीमने चंदीगडच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये दुपट्टा पाठवण्याची परवानगी मागितली होती, ज्या दुपट्ट्याच्या वापर करून अभिनेत्रीने आत्महत्या केली. तसेच, सीबीआयला जप्त अभिनेत्रीचा फोन अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला पाठवायचा होता. जेणेकरून जिया आणि सूरज यांच्यातील Chat शोधता येतील जे हटवले गेले.

जियाची आई गेली ८ वर्षे न्यायासाठी लढा देत आहे. पण आजच्या काळात कोणीही तिच्या पाठीशी उभे राहत नाही. जिया खानने मनोरंजन विश्वात खूप कमी वयात नाव कमावले होते. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर जियाची आई सतत तिच्यासाठी न्यायाची मागणी करत आहेत. अभिनेत्री जिया खान हिचे निधन झाले, तेव्हा ती अवघी २५ वर्षांची होती. जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पंचोलीला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. १० जून २०१३ रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत खटला सुरू होता.

Web Title: Big relief to Suraj Pancholi! Jiah Khan's suicide case rejected petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.