बिग बॉस विजेता आणि खासदाराचा मुलगा ड्रग्ज पार्टी करताना पकडला गेला, ओवेसी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:53 PM2022-04-07T14:53:22+5:302022-04-07T14:55:15+5:30
Drug Party raid Case : सर्वांना सोडून देण्यात आले. आता AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या मुद्द्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील पंचतारांकित हॉटेलवर टाकलेल्या छाप्यांवरून राजकारण तापले आहे. या छाप्यात पोलिसांनी 100 हून अधिक जणांना ताब्यात घेतल्याचा आणि घटनास्थळावरून अमली पदार्थ जप्त केल्याचा दावा केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही मोठी नावे आणि टॉलिवूडशी संबंधित सेलिब्रिटींची मुले असल्याचे सांगण्यात आले. मात्र नंतर या सर्वांना सोडून देण्यात आले. आता AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदारअसदुद्दीन ओवेसी यांनी या मुद्द्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
रविवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये सर्व उच्चभ्रू घरांतील मुलांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका विद्यमान खासदाराचा मुलगा, प्रसिद्ध टॉलीवूड फिल्मस्टार कुटुंबावर भाष्य करणारी अभिनेत्री, आंध्र प्रदेशातील एका उच्च पोलीस अधिकाऱ्याची मुलगी, माजी बिग बॉस विजेती आणि इतर श्रीमंत घरातील मुलांचा समावेश आहे.
असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?
हॉटेलमधील 'रेव्ह' पार्टीचा भंडाफोड केल्याप्रकरणी ओवेसी यांनी राज्यातील टीआरएस सरकारवर निशाणा साधला आणि पोलिसांवर प्रभावशाली लोकांच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. ओवेसींनी ट्विटरवर लिहिले की, सर्व श्रीमंत मुलांना सोडण्यात आले, तर कायदा सर्वांसाठी समान असावा.
Rule of law is supreme Art 13 & it is very unfortunate that cocaine was found in this “Rave party” and all offspring’s of Rich kids where released not a single arrest apart from the owner of the place
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 6, 2022
Law should be applied equally to poor & rich @CPHydCity@KTRTRShttps://t.co/WehHaS5BTK