मेहुणीचं अपहरण करून तीन महिने केला रेप, मग पत्नी आणि मेहुणीला पाजलं विष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:17 PM2023-03-25T13:17:19+5:302023-03-25T13:17:26+5:30

Crime News : पीडित मेहुणीनुसार, तिचा भाओजी राहुल याने तिला जानेवारी महिन्यात 5 लोकांसोबत मिळून जबरदस्ती उचलून नेलं होतं. 4 दिवस त्याने तिला मित्रांच्या घरी ठेवलं.

Bihar : Brother in law kidnapped and raped his sister in law then poisoned | मेहुणीचं अपहरण करून तीन महिने केला रेप, मग पत्नी आणि मेहुणीला पाजलं विष

मेहुणीचं अपहरण करून तीन महिने केला रेप, मग पत्नी आणि मेहुणीला पाजलं विष

googlenewsNext

Crime News : बिहारच्या पूर्णियामधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. भाओजीने पत्नी असूनही आपल्या मेहुणीला काही लोकांसोबत मिळून उचलून नेलं. नंतर तीन महिने तिचं लैंगिक शोषण केलं. जेव्हा पत्नी आणि मेहुणीने विरोध केला तेव्हा दोघींनाही लस्सीमध्ये विष दिलं. आरोपीची पत्नी आणि मेहुणी दोघीही पूर्णियाच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. 

पीडित मेहुणीनुसार, तिचा भाओजी राहुल याने तिला जानेवारी महिन्यात 5 लोकांसोबत मिळून जबरदस्ती उचलून नेलं होतं. 4 दिवस त्याने तिला मित्रांच्या घरी ठेवलं. नंतर पूर्णियाला आणलं आणि रोज तिच्यावर अत्याचार केले. विरोध केल्यावर तिला मारहाण केली आणि धमकी देत होता की, हत्या करून गंगा नदीत फेकेन. कुणीही तिला वाचवू शकणार नाही.

आरोपीच्या पत्नीने सांगितलं की, गुरूवारी त्याने पत्नी आणि मेहुणीला काही कारणाने बाजारात बोलवलं. जिथे त्याने लस्सीमध्ये विष टाकून दोघींनी पाजलं. जेव्हा त्या दोघी घरी पोहोचल्या तेव्हा बेशुद्ध झाल्या आणि त्याने बाहेरून दरवाजा बंद केला. मग तो पळून गेला. कशातरी त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. पत्नी म्हणाली की, पती दारू विकत होता. त्याने दोघींना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. 

तेच पतीच्या आईचं म्हणणं आहे की, तिचा मुलगा फरार आहे.  त्याने विष नाही तर भांग पिण्यास दिलं होतं. त्यानंतर पती दोघींनाही धमकी देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. मीडियाचा कॅमेरा पाहून तो तिथून फरार झाला. याबाबत अजूनही पीडितेने तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस म्हणाले की,  तक्रार मिळाल्यावर कारवाई करता येईल.
 

Web Title: Bihar : Brother in law kidnapped and raped his sister in law then poisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.