धक्कादायक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 10:21 AM2020-11-10T10:21:19+5:302020-11-10T10:30:41+5:30

BJP And Crime News : भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

bihar election husband of bjp leader shot dead at ara just before counting | धक्कादायक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

धक्कादायक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Next

आरा - बिहारच्य भोजपूर जिल्ह्यामध्ये मतमोजणीआधी (Bihar Assembly Elections 2020) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुंदरनगर परिसरात भाजप्या नेत्याच्या पतीला गोळ्या घालण्यात आल्या. मिळालेल्य माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी बाईकवरून आलेल्या सशस्त्र गुन्हेगारांनी सिव्हिल कोर्टाच्या वकिलावर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. 

प्रीतम नारायण सिंह उर्फ साहेब सिंह असं वकिलांचं नाव असून ते भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष असणाऱ्या नेत्याचे पती आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्या विशेष सक्रीय असलेल्या पाहायला मिळाल्या. या घटनेनंतर प्रीतम नारायण सिंह यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पाटणा याठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

निकालाआधी भाजपाच्या महिला नेत्याच्या पतीची हत्या झाल्याने मोठी खळबळ

बिहारमध्ये निकालाआधी भाजपाच्या महिला नेत्याच्या पतीची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भोजपूर एसपी हर किशोर राय, एसपीडीपीओ पंकज कुमार रावत, शहर पोलीस प्रमुख धर्मेंद्र कुमार, नवादा पोलीस स्टेशनचे अध्यक्ष संजीव कुमार घटनास्थळी दाखल झाले. "वडील संध्याकाळी सिव्हिल कोर्टातून बाईकवरून परतत होते तेव्हा सुंदरनगर मोहल्ल्यामध्ये मंदिराजवळ दोन जणांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्यावर गोळी झाडली" अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना केली अटक

प्रीतम नारायण सिंह यांच्या डोक्यात आणि पाठीवर गोळी लागली आहे. त्यांचा मुलगा प्रियदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांचा त्यांच्या काकांशी जमिनीवरून वाद होता. अद्याप या घटनेबाबत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नाही आहे. भोजपूरचे एसपी हर किशोर राय यांनी सध्या या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू आहे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल. पोलिसांनी याप्रकरणी सध्या दोन जणांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Read in English

Web Title: bihar election husband of bjp leader shot dead at ara just before counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.