मुलाच्या गैरहजेरीत सासरा पडला सूनेच्या प्रेमात, मुलाला लागला याचा पत्ता; नंतर जे झालं ते वाचून चक्रवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:00 PM2021-07-26T18:00:35+5:302021-07-26T18:01:36+5:30
कोदरा येथे राहणाऱ्या मिथिलेश रविदासने केवळ आपल्या मुलाची हत्याच केली नाही तर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली.
बिहारच्या (Bihar Crime News) पटनामधून हत्येची (Father Murder Son) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलाने आपल्या मुलाची हत्या केलीये. कारण मुलाला वडिलांच्या आणि त्याच्या पत्नीच्या अफेअरबाबत समजलं होतं. म्हणजे सासरा आणि सूनेच्या प्रेम प्रकरणातून (Extra Marrital Affair) ही हत्या झाली आहे. कोदरा येथे राहणाऱ्या मिथिलेश रविदासने केवळ आपल्या मुलाची हत्याच केली नाही तर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली.
पालीगंज पोलीस स्टेशनचे डीएसपी राजीव सिंह म्हणाले की, आरोपीचा २२ वर्षीय मुलगा सचिन गुजरातमध्ये नोकरी करत होता. मुलगा जास्तीत जास्त दिवस घरातून दूर राहत असल्याने सासऱ्याचं सूनेसोबत सूत जुळलं. याची माहिती सचिनला लागली तेव्हा सचिन लगेच जुलै महिन्यात घरी परतला. वडिलांनी मुलाच्या बेपत्ता असण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसातच त्याचा मृतदेह पटण्याच्या एका उपनगरात आढळला. (हे पण वाचा : भाडेकरू तरूणासोबत पळून गेली घरमालकाची पत्नी, सोबत १० वर्षाच्या मुलालाही घेऊन गेली...)
तपासादरम्यान पोलिसांना सचिनचा वडील मिथिलेश आणि सचिनच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. डीएसपी राजीव सिंह म्हणाले की, जेव्हा राजीव घरी परतला तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या वडिलात जोराचं भांडण झालं. भांडणादरम्यान मिथिलेशनने आपल्या मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि मृतदेह बागेत लपवून ठेवला.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने आपल्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. त्यात त्याने पाच संशयित लोकांनी नावेही दिली. त्याच दिवशी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तक्रारीनंतर काही वेळासाठी मिथिलेश पोलिसांपासून वाचण्यात यशस्वी ठरला. पण पोलिसांनी लवकरच त्याला पकडलं. मिथिलेशला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.