स्वत:च्या मुलीवर बापाकडून अत्याचार; कोर्ट म्हणालं दोषीला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात डांबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 01:12 PM2022-02-04T13:12:15+5:302022-02-04T13:12:38+5:30

जोवर आरोपी या जगात श्वास घेतोय तोवर तो तुरुंगातच राहील, अशा कठोर शब्दांत कोर्टानं दोषीला शिक्षा सुनावली आहे.

bihar gaya daughter rape guilty father court verdict life imprisonment punishment | स्वत:च्या मुलीवर बापाकडून अत्याचार; कोर्ट म्हणालं दोषीला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात डांबा!

स्वत:च्या मुलीवर बापाकडून अत्याचार; कोर्ट म्हणालं दोषीला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात डांबा!

Next

गया-

बिहारच्या गया येथील कोर्टानं बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या हैवान पित्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जोवर आरोपी या जगात श्वास घेतोय तोवर तो तुरुंगातच राहील, अशा कठोर शब्दांत कोर्टानं दोषीला शिक्षा सुनावली आहे. या नराधमानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं होतं. 

गया कोर्टानं गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकरणाची सुनावणी केली आणि दोषीला शिक्षा सुनावली. आरोपी पिता आपल्याच अल्पवयी मुलीवर वर्षभरापासून अत्याचार करत होता. जेव्हा मुलगी गर्भवती राहिली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा गर्भपात देखील करण्यात आला होता. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना जुलै २०२० सालची आहे. आरोपी सुरेंद्र पासवान याच्याकडून आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले जात होते. वर्षभर हा संपूर्ण प्रकार सुरू होता. जेव्हा मुलगी गर्भवती राहिली तेव्हा तिचा गर्भपात देखील करण्यात आला. पीडित मुलगी आणि तिच्या आईनं जेव्हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला तेव्हा हे सर्व प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली. 

सिविल कोर्टाच्या विशेष न्यायाधीश एडीजे सेवेन नीरज कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर दोषी पित्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसंच दोषीवर ३५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. 

Web Title: bihar gaya daughter rape guilty father court verdict life imprisonment punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.