धक्कादायक! भर दिवसा ग्रामस्थांनी चक्क 300 बकऱ्या चोरल्या अन्...: नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:53 PM2022-09-22T18:53:33+5:302022-09-22T18:59:26+5:30

ग्रामस्थ मोठ्या संख्येने ट्रकजवळ पोहोचले. अनेक जण बकऱ्या घेऊन पळाले.

bihar goats looted in arwal going from patna to kolkata question on police | धक्कादायक! भर दिवसा ग्रामस्थांनी चक्क 300 बकऱ्या चोरल्या अन्...: नेमकं काय घडलं?

फोटो - NBT

googlenewsNext

बिहारच्या अरवलमध्ये भर दिवसा बकऱ्या पळवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 139 वर उमैराबादजवळ ट्रक थांबला असताना ग्रामस्थांनी ट्रकमधून बकऱ्या पळवून नेल्या. ग्रामस्थांनी जवळपास 300 बकऱ्या चोरल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-औरंगाबाद मुख्य मार्गावरून ट्रक कोलकात्याला जात होता. 

रस्त्यात थांबवून ग्रामस्थांनी बकऱ्या उतरवण्यास सुरुवात केली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने ट्रकजवळ पोहोचले. अनेक जण बकऱ्या घेऊन पळाले. कोणी दुचाकीवरून येत, तर कोणी पायी येऊन बकऱ्या पळवून नेल्या. ट्रकमधून नेमक्या किती बकऱ्या चोरीला गेल्या याचा नेमका आकडा समोर आलेला नाही. बकऱ्यांची मोजदाद झाल्यावरच चोरीला गेलेल्या बकऱ्यांची नेमकी संख्या समजू शकेल. 

जवळपास 300 बकऱ्या पळवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी शंभू पासवान यांनी सांगितलं.बकऱ्यांनी भरलेला ट्रक कोलकात्याच्या दिशेनं जात होता. ग्रामस्थ बकऱ्या पळवून नेत असल्याचं पाहून चालकाने ट्रक सुरू केला आणि तिथून निघाला. या घटनेमुळे उमैराबादमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले. मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी बकऱ्या पळवल्या होत्या. या प्रकरणी पोलीस स्थानिकांकडून माहिती घेत आहेत. अद्याप कोणीही या घटनेची तक्रार पोलिसांकडे केलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: bihar goats looted in arwal going from patna to kolkata question on police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.