Bihar Gundaraj: गुंडाराज! देशातील एकमेव कॉलेज, जिथे मुली एके ४७ च्या सावलीत शिकताहेत, आहेत त्रस्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:17 PM2023-02-10T23:17:52+5:302023-02-10T23:18:14+5:30
मनेरच्या कॉलेमध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व पोलिसांकडे एके ४७ रायफली आहेत. या रायफलींच्या संरक्षणात मुली कॉलेजला येत-जात आहेत.
बिहार आणि गुंडाराज काही नवीन नाही. रात्री ९-१० वाजले की या राज्यातून प्रवास करणाऱ्या ट्रेनचे दरवाजे आतून लॉक केले जायचे, असे सांगितले जाते. नितीश कुमार कितीही सुशासनची बाता मारत असले तरी तेथील परिस्थिती दिवसेंदिवर बिघडत आहे. नुकताच एक धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. तेथील एका शहरातील कॉलेजच्या मुली बंदुकधारी पोलिसांच्या संरक्षणात शिकत आहेत.
मनेरच्या कॉलेमध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व पोलिसांकडे एके ४७ रायफली आहेत. या रायफलींच्या संरक्षणात मुली कॉलेजला येत-जात आहेत. यावरून तुमच्या तेथील काय परिस्थिती असेल ते लक्षात येतेय
मणेरमध्ये स्थानिक तरुणांनी कॉलेजमध्ये असा काही हैदोस घातला आहे की, इथल्या 80 टक्के विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये येणेच बंद केले आहे. ज्या येत आहेत, त्या देखील जीव मुठीत घेऊन येत आहेत. पालकही मुलींना पाठवत नाहीएत. मणेर पोलिस ठाण्यातील पोलीस फोर्स या कॉलेजच्या बंदोबस्ताला लावण्यात आली आहे. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन नावाच्या खासगी पॅरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींना बदमाशांचा त्रास होत आहे.
३० जानेवारीपासून या कॉलेजच्या मुलींची मोठ्या प्रमाणावर छेडछाड काढली जात आहे. त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कॉलेज प्रशासनाने या गावगुंडांची तक्रार केली तेव्हा या गुंडांनी कॉलेजवर हल्ला केला. गोळीबारही केला आहे. मुलींशी असभ्य वर्तनही केले आहे. यानंतर पोलिसांनी कॉलेजला बंधुकधारी पोलिसांचा बंदोबस्त पुरविला आहे.
पोलिस दिवसभर मुंलींच्या सुरक्षेत गुंतलेले असतात. कॉलेजच्या बाहेर आणि कॉलेजच्या आत पोलिस तैनात आहेत. पोलिसांचा बंदोबस्त कायमच दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस कॅम्पसवर लक्ष ठेवून आहेत. कॉलेजची वेळ संपल्यानंतरच पोलिस येथून निघून जात आहेत. तसेच तिथे कोणीही विद्यार्थीनी राहिली नाहीय ना याचीही तपासणी केली जात आहे.
स्थानिक गुंड महाविद्यालयात शिकणाऱ्या मुली आणि मुलांचीही मारहाण करून त्यांची छेड काढतात. यामुळे या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बाहेरील राज्यांतून आलेले शिक्षकही भितीच्या छायेत आहेत. अद्यापपर्यंत गुन्हेगारांना अटक झालेली नाही, पोलिसांच्या उपस्थितीत अभ्यास केला जात आहे.