लव्ह मॅरेज करूनही एक्स बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती पत्नी, पतीने जे केलं ते वाचून उडेल थरकाप!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:11 AM2022-02-26T11:11:10+5:302022-02-26T11:12:04+5:30
Bihar : पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तरूणाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या त्याला उपचारासाठी पटना येथे रेफर करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
(प्रातिनिधीक छायाचित्र)
बिहारच्या (Bihar) मुंगेरमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे (Extra Marrital Affiar) पतीने असं काही केलं जे वाचून कुणाचाही थरकाप उडेल. पतीने रागात पत्नीच्या प्रियकराचे हात पाय बांधून त्याचा गळा चिरला. नंतर घटनास्थळावरून फरार झाला. काही लोकांनी तरूणाला या स्थितीत पाहिलं तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. ही घटना २४ फेब्रुवारीची आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तरूणाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या त्याला उपचारासाठी पटना येथे रेफर करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
डीएसपी नंदजी प्रसाद यांच्यानुसार, साजन नावाच्या व्यक्तीला जेव्हा समजलं की, त्याच्या पत्नीचे रूपेश नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहे तर तो संतापला. त्याने रागाच्या भरातच रूपेशला मारण्याचा प्लान बनवला. आपल्या भावासोबत मिळून त्याने प्लान केला आणि रूपेशला अमझोर डोंगरावर बोलवलं.
रूपेश तिथे पोहोचल्यावर दोघांनी त्याचे हात आणि पाय बांधून त्याचा गळा चिरला. दोघेही आरोपी नंतर तेथून फरार झाले. अशातही रूपेश कसातरी डोंगराच्या खाली आला आणि लोकांनी त्याला जखमी असल्याचं पाहत पोलिसांना सूचना दिली.
पोलिसांनी सांगितलं की, गंभीर जखमी रूपेश काहीच बोलू शकत नव्हता. त्यामुळे त्याने कागदावर साजन आणि सागरचं नाव लिहून पूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली. चौकशीदरम्यान दोन्ही भावांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. आरोपी पतीने सांगितलं की, त्याने लव्ह मॅरेज केलं होतं. तरीही त्याची पत्नी एक्स बॉयफ्रेन्डसोबत बोलत होती आणि त्याच्यासोबत अनैतिक संबंधही ठेवत होती. सध्या पोलीस याची चौकशी करत आहेत.